Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता..! पहा कुठे पडणार पाऊस व कुठे पडणार उष्णतेची लाट?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील चार दिवस जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई सह कोकणात उष्णतेची लाट पायाला मिळेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. आणि या सोबतच पूर्व विदर्भात जोरदार अवकाळी पाऊस पडणार आहे.

राज्यातील काही भागात गारपीट झाले आहे तर विदर्भसह पश्चिम महाराष्ट्रात आजही अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. त्याशिवाय पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि कोणत्या भागात उष्णतेचा प्रभाव वाढणार आहे त्याबद्दलही सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मुंबई आणि कोकणात तापमान वाढले

मुंबई आणि कोकण विभाग उष्णतेच्या लाटेत होरपडला आहे. कोकणात उकडा वाढला आहे. मुंबई सह कोकण पुढील चार दिवसात उष्णतेच्या तडक्यात सापडणार आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण यांच्या तापमानात फारसा फरक नाही. तापमानात कंचीत वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Rain Alert

पूर्व विदर्भात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता

पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस सोबत गारपीट देखील होणार आहे. या भागात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान पूर्व विदर्भात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असून यामुळे फळबागी शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात वादळी वाऱ्या सोबत पाऊस

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी विजेच्या गडगडात सह वादळ वारे वाहण्याचा अंदाज आहे. यासोबत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये टिळक ठिकाणी विजेच्या कडकडातासह आणि वादळ वाऱ्यासोबत हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

येत्या चार दिवसात कसे राहणार हवामान?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. आय एम डी च्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्यात 12 मे पर्यंत पुढील चार दिवस ढगाच्या गडगडाटासह आणि वादळ वाऱ्यासोबत जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजेच्या गडगडात सह आणि वादळवारासोबत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये फक्त पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

अतिशय महत्त्वाची बातमी

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!