Rain Alert: नमस्कार मित्रांनो, राज्यातील काही भागात पाऊस तर काही भागात वादळ वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी ऊन वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
राज्यात कुठे पडणार अवकाळी पाऊस जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
उन्हाली बाजरीला या ठिकाणी मिळतोय सर्वाधिक बाजारभाव, पहा आजचा बाजार भाव
मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ वाऱ्यासोबत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज विजा आणि मेघगर्जनासोबत काही ठिकाणी वादळ वारे पावसाचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रात्रीची उष्णता ही जास्त राहील असे हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे.
अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जना सोबत वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उद्यापासून राज्यात हवामान कोरडे राहून उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.