Rain Alert | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने वतवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे पिकांची विशेष काळजी घ्यावी असे देखील सांगण्यात आलेले आहे. कार मध्यंतरी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांच्या अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच, दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसायटीचे वाराचा देखील शहरा देण्यात आलेला आहे. या काळामध्ये 30 ते 40 किमी प्रति विभागाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यतील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता. तर काही भागात किमान तापमान मोठी वाढ होऊ शकते.
तसेच दुसरीकडे स्कायमेट ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पंजाब, पश्चिम हिमालय, केरळ, हरियाणा, सिक्कीम आणि पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
गिलगिट बालिस्तान मुझफ्फाराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी बर्फ वृष्टी देखील झाले आहे. महाराष्ट्राची अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
पुढील चार दिवस उत्तराखंडमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मेघगर्जनाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसामुळे तापमान घट होऊ शकते तर पुढील दोन दिवस महाराष्ट्रात ही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा वादळी वाऱ्याची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आलेली आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.