Rain Alert | देशासह राज्याच्या शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अवकाळी पाऊस. पावसाने देशाचा अनेक भागांमध्ये थैमान घातलेले दिसून येते आहे. आज ही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राचं देशात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळणार आहे.
मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले होते. यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, हवामान विभागाने येत्या काळात देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात अवकाळी पावसाची शक्यता कायम
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ईशान्यकडील राज्यामध्ये पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार ईशान्येकडील राज्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेश मुसळधार पाऊस आणि हिमवृष होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये कमाल तापमानामध्ये घट होणार असून असंत ढगाळ आकाश राहील.
महाराष्ट्रासह या भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पूर्व आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 मार्च आणि 7 मार्च रात्री पश्चिम हिमालयन प्रदेशात जोरदार पाऊस व हिमवर्षा पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र मध्ये विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मध्यंतरी विदर्भामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान केले होते. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.