Purity Of Gold: नमस्कार मित्रांनो, सध्या लग्नसराई चे दिवस आहेत, त्याचबरोबर अक्षय तृतीयेमुळे बरेच लोक नवीन दागिने खरेदी करत असतात. जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर मग कोणते सोने सर्वात शुद्ध व चांगले? दागिने नेमके कशाचे करावे? असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित होत असतील. अनेक नागरिकांना 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यातील फरक ही माहीत नसतो.
आजचा सोन्याचा भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आजच्या जगात पुरुष असो किंवा महिला सर्वांनाच सोन्याचे दागिने वापरायला आवडतात. कोणत्याही सणाला लोक आवडीने सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचा दागिना भेट मिळाल्यावर तर जो आनंद होतो तो वेगळाच असतो. आजच्या जगात गुंतवणुकीच्या बाबतीत सोने हा धातू सर्वात सरस आहे. जर कोणाला पैशाची गुंतवणूक करायची असेल तर अनेक जण सोने खरेदी करतात.
सोने हे गोल्ड बॉन्ड, फिजिकल गोल्ड अशा वेगवेगळ्या रूपात असतं. गुंतवणूक करायची असेल तर या दोन्ही मार्गाने तुम्ही गुंतवणूक करू शकता. मातृ गुंतवणुकीसाठी नेमका कोणता सोनं सर्वात शुद्ध असतं? कोणत्या सोन्याचे दागिने करायला हवेत? कोणत्या सोन्यात पैशाची गुंतवणूक करावी? असे प्रश्न अनेक नागरिकांना पडत असतात. आजच्या या लेखात या सर्व प्रश्नाचे उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
5 लाखांच्या ठेवीवर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील, 1 मे पासून नवीन नियम लागू
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोने म्हणजे काय?
वजन मोकण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लिटर हे एकक आहे. त्याचप्रमाणे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हा कॅरेट जास्त तेवढेच सोने सुद्धा असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोन्याची शुद्धता आहे 99.9% एवढी असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत सर्वाधिक असतो.
24, 22, 18, 14 अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने आहे. 24 कॅरेट सोने सोडता इतर सर्व प्रकारच्या सोन्या तांबे चांदी असे धातू मिसळलेले असतात. सोन्याच्या दागिन्यांना मजबूती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुणवत्ता ही बी आय एस च्या संस्थेमार्फत ठरवली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे असा सल्ला दिला जातो. Purity Of Gold
पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना..! 1500 रुपये जमा केल्यास तुम्हाला 4 लाख 73 हजार रुपये मिळतील, पहा सविस्तर माहिती
गुंतवणुकीसाठी कोणते सोने चांगले?
पैशाची गुंतवणूक करायचे असेल तर सोने खरेदी करताना अनेक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवढे शुद्ध सोने असेल भविष्यात तुम्हाला तेवढेच जास्त पैसे मिळणार आहेत. याच कारणामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भविष्यातही 24 कॅरेट सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशाचे गुंतवणूक करायची असेल तर 24 कॅरेट सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी 22 कॅरेट सोने हे देखील चांगले आहे.
दागिन्यासाठी कोणते सोने योग्य आहे?
सोन्याचे दागिने करायचे असतील तर 24 कॅरेट सोन्यापासून तयार करता येत नाहीत. कारण 24 कॅरेट सोने हे फार नरम असते. ते लगेच तुटते त्यामुळे 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्यापासून दागिने तयार करणे चांगले आहे. अशा सोन्यात तांबे चांदी अशा प्रकारचे धातू मिसळले जातात.
3 thoughts on “सोने खरेदी करताय! तर मग पहा 22 कॅरेट की 24 कॅरेट कोणते सोने सर्वात चांगलं?”