Punjabrao Duck Meteorologist : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचा आणि कामाचा सल्ला दिलेला आहे. खरंतर सध्या राज्यातील खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे सध्या राज्यात सोयाबीन कापूस व मका या पिकांची हार्वेस्टिंग प्रगती पथावर आहे.
यंदा पाऊस खूपच कमी झाले असल्याने सोयाबीन आणि कापसाचे उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बांधवांना आता रम रब्बी हंगाम पिकावर मदार राहणारा आहे. खरीप हंगामामध्ये जरी पिकाची नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामा मधून चांगले उत्पन्न मिळणार आहे व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरून निघणार आहे असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
महाराष्ट्र मध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा आणि गहू या दोन पिकांची मोठी प्रमाणे मध्ये लागवड केली जाते. याच बद्दल ज्येष्ठ हवामान पंजाब डक यांनी एक महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे.
डक यांनी शेतकरी बांधवांना गहू आणि हरभरा पेरणी केव्हा करावी याबाबत महत्त्वाची सूचना दिली आहे तसेच गव्हाच्या कोणत्या जातीची निवड काय केली पाहिजे.याबाबत देखील पंजाबराव यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
डक सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी गहू पेरणी करण्यापूर्वी एक प्रयोग करून पाहिला पाहिजे यासाठी शेतकरी बांधवांना एक स्टीलच्या वाटीमध्ये खोबरे तेल घ्यायचे आहे. ज्यावेळी हे खोबरेतील घट्ट होईल त्यावेळी गहू आणि हरभरा पेरणी करावी असे त्यांनी सांगितले आहे म्हणजे गव्हाणे हरभरा पेरणी अशावेळी करावी ज्यावेळी थंडीची तीव्रता चांगल्यापैकी वाढलेली असेल.
पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी गव्हाच्या पिकातून एकरी पंचवीस क्विंटल पर्यंत उतारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी गव्हाच्या सुधारित जातीची निवड करणे आवश्यक आहे .या रब्बी हंगामामध्ये श्रीराम कंपनीचे 111, अजित आणि रुची या जातीच्या तसेच म्हायको कंपनीचे 7070, पेरणी शेतकरी बंधू करावी तसेच शेतकऱ्यांनी एकरी 40 किलो गावाचे बियाणे वापरावे असेच देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे तसेच एकरी दोन बॅग डीपीच्या वापराव्यात आणि योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करावे अशी देखील सांगितले आहे.