पंजाब रावांचा नवीन हवामान अंदाज : अखेर अवकाळी पावसाचे थैमान थांबले; पण ‘या’ तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पडणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PunjabRao Dak update : मान्सून 2023 मध्ये खूपच कमी पाऊस झाला. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात यंदाही सरासरीपेक्षा जवळपास 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली. यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे फारच नुकसान झालेले आहेत.

याशिवाय, द्राक्ष सारख्या फळबागांना देखील या पावसाचा फटका बसलेला आहे. चालू महिन्यातही राज्यात अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच बहुतांशी ठिकाणी ढगा हवामान पाहायला मिळालेले आहे.

त्यामुळे शेती पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम झाला असून, रब्बी हंगामातील हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात मर रोग पाहायला मिळत आहे.

पीक पेरणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा हजार रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये हरभऱ्याची पुन्हा पेरणी करावी लागू शकते, असा अंदाज आहे.

अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव ढक यांनी महाराष्ट्रातील हवामानाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

डक यांनी सांगितल्याप्रमाणे आता नऊ डिसेंबर पासून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार आहे. तसेच हळूहळू थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज त्यांनी दिला आहे. मार्च महिन्यापर्यंत थंडी राहण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक पाऊस पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखीन एक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावणार, असल्याचा त्यांनी दावा दिला आहे.

एवढेच नाही, तर नवीन वर्षात सुरुवातीला अर्थातच जानेवारी महिन्यातही एक पाऊस पडेल, असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान आता प्रामुख्याने कोरडे राहणार आहे असा अंदाज आहे.

काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील. आणि हळूहळू थंडीचा जोर वाढेल, असे बोलले जात आहे. तसेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!