Pradhanmantri aawas Yojana : ज्या नागरिकांनी अद्याप घरकुल चा लाभ घेतला नाही , अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना. याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुल देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत, आवास प्लस प्रणालीमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या परंतु स्वयंचलित प्रणालीद्वारे नाकारलेल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांना तसेच जिल्हा निवड समितीने शिफारस केल्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभ दिले जाणार आहे. त्यानंतर दुर्बळ घटकातील इतर पात्र अर्जांचा विचार करण्यात येणार आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी 1.2लाख रुपयांची आर्थिक सहाय्यक देण्यात या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु या योजनेची अट आहे .की ,घराची किमान आवश्यक क्षेत्र हे 270 चौरस फूट असावे.
Pradhanmantri aawas Yojana
लाभार्थी निवड ही ग्रामसभेद्वारे केली जाणार आहे. कोणतेही लाभार्थीसाठी साईट पडताळणी प्रलंबित असल्यास निवड करण्यापूर्वी ते पूर्ण केले जाणार. यानंतर लाभार्थ्याची ग्रामसभेत निवड झाल्यावर गटविकास अधिकाऱ्याकडून लाभार्थीची तालुकास्तरीय तपासणी होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :
- 1.लाभार्थी हा भारतीय असला पाहिजे.
- 2.भूमीहिन कुटुंबाच्या मालकीचे पक्के घर नसले पाहिजे.
- 3.ज्या कुटुंबासाठी कच्चे घर आहे ,परंतु घर बांधण्यासाठी दुसरी जमीन नाही.
- 4.आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतला नाही ते कुटुंब.
- 5.ज्या कुटुंबाचे घर नैसर्गिक आपत्ती नष्ट झाले आहे, व त्याच्याकडे स्वतःची जमीन आहे असे कुटुंब.
आवश्यक कागदपत्रे:
- लाभार्थ्यांचा आधार कार्ड.
- जात प्रमाणपत्र.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- बँक खाते.
- इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यांनी सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेचे माध्यमातून आर्थिक मदत मिळणारी ही, थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येईल.
या योजनेचा असा हेतू आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू ग्रामीण कुटुंबाला त्यांचे पक्के घर मिळावेत व त्यांचे राहणीमान व्यवस्थित व्हावे ,आणि ग्रामीण भागाचा विकासा विकास व्हावा.
हे पण वाचा:-राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, एक जानेवारीपासून होणार नवीन नियम लागू