Pradhan Mantri Awas Yojana: नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना हक्काचे घर मिळत आहे. अनेक लोकांचे स्वप्नातील घर निर्माण होत आहे. आता या योजनेच्या मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत. लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या योजनेसाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत देशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखीन तीन कोटी घर बांधण्यावर सर्वांचे एकमत दर्शवण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते. किंवा घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
PMAY अंतर्गत आता घरासोबतच शौचालय, विज, एलपीजी कनेक्शन नळ जोडणे अशा सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना नेमकी काय आहे? या योजनेत कशाप्रकारे ला मिळतो? त्यासाठी काय कागदपत्रे लागतात? ही सर्व माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदतवाढ! तुमचे रेशन कार्ड EKYC लवकर करून घ्या, अन्यथा मोठे नुकसान होईल
प्रधानमंत्री आवास योजना काय आहे?
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य लोकांना घर बांधून दिले जाते. त्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. देशातील गरीब लोकांना स्वतःचे हक्काचे व स्वप्नातील घर मिळावे म्हणून ही योजना चालू करण्यात आली आहे. पूर्वी या योजनेचा एवढा विस्तार झालेला नव्हता मात्र या योजनेचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला आहे.
गरिबापासून ते मध्यमवर्गीयापर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी आता या योजनेतून निधी दिला जात आहे. या गटांनुसार घरासाठी कर्ज दिले जाते. अगोदर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होते. या कर्जावर अनुदानही मिळत होते. आता या कर्जाची मर्यादा 18 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. Pradhan Mantri Awas Yojana
सोने खरेदी करायची सुवर्णसंधी! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, येथे 10 ग्रॅम सोन्याची नवीनतम किंमत पहा
पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत आहे.
- त्यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येत आहे अगोदर ठरवा.
- त्यानंतर पीएम आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- मुख्य मेनू मध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार हा पर्यायावर सिलेक्ट करा.
- त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल तिथे तुमचा आधार नंबर टाका.
- पुढे वैयक्तिक माहिती, बँक संदर्भातील माहिती, तुमच्या स्वतःच्या घराचा पत्ता इत्यादी माहिती भरा.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कॅप्चर कोड टाका आणि पूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासून सबमिट बटणावर क्लिक करा.
जुने पारंपारिक मिटर होणार बंद..! महावितरण तर्फे प्रीपेड स्मार्ट मीटर लॉन्च
कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे?
पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही अतिशय आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. या सोबत तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे. यासोबतच फॉर्म क्रमांक 16, बँक खात्याची स्टेटमेंट, आयटी रिटर्न्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
1 thought on “स्वप्नातील घर होणार पूर्ण! पंतप्रधान आवास योजनेला अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती”