PM KISHAN योजनेचा हप्ता 27 जुलैला पडणार:- शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता 27 जुलैला पडणार आहे. बरेच दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे शेतकऱ्यांना 14 हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे. केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पीएम किसन योजना द्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये चार महिन्याला दोन हजार रुपये जमा केले जातात असेच या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होतात
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये आत्तापर्यंत 13 हप्ते जमा झाले आहेत. केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून या योजनेचा लाभ दिला जातो. व शेतकरी बऱ्याच दिवसांपासून 14 वा हप्त्याची वाट पाहत होते. परंतु शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 जुलै 2023 या रोजी पीएम किसन योजनेचे हप्त्याचे वितरण होईल.
पी किसान योजनेचा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 जुलै २०२३ रोजी 11 वाजता 8.5 करोड जनतेला चौदाव्या हफ्त्याची मानधन जमा होईल
आधी हे करावा लागेल तरच मिळणार पीएम किसन योजनेचा हप्ता
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधी तुमच्या तांत्रिक अडचणी नीट करावा लागतील. व ई केवायसी तुमची पूर्ण असायला हवी तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल चौदावा हप्ता पडण्यासाठी खूप टाईम आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली पीएम किसान योजनेची E-KYC पूर्ण करावी लागणार आहे. जवळ तुमच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही E-KYC करू शकता. हो तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे ही E- KYC करू शकता. E-KYC करण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करा.
E- KYC कशी करावी ?
1)ऑनलाइन E-KYC करण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागणार आहे.
2) या अधिकृत वेबसाईटवर E-KYC पर्याय या दिले दिलेला आहे. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
3) तुम्ही E-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर लिहिण्यासाठी एक जागा मिळेल . त्या दिलेल्या जागेवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
4) त्यानंतर पी एम किसान सन्माननिधी ची लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा.
5) या संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर , तुमची केवायसी कम्प्लीट होईल. व यानंतर तुम्हाला पी एम किसान या योजनेचा हप्ताचा लाभ मिळेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली लिंक चा वापर करा