Pimpalgaon Onion Market Rate Today | केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्यानंतर कांद्याचे बाजार भाव सातत्याने घसरत आहेत. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला मालाला योग्य भाव मिळत नसल्याने जीवाची घालमेल वाढत आहे. सध्या बाजारामधली चित्रे पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. मायबाप सरकार शेती कशी करावी असा प्रश्न शेतकरी वर्ग मधून व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे भाव घसरल्यानंतर आज पर्यंत तो वर आला नाही. आजचा बाजार भाव पाहायचे झाले तर, कांद्याला सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे. म्हणजेच 11 ते 12 रुपये किलो प्रति कांद्याला दर मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
पिंपळगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आपण ते जाणून घेणार आहोत.
राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार समिती माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेल्या आजच्या अहवालानुसार लालसगाव बाजार समितीमध्ये 12 हजार 597 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर कमीत कमी पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला व सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समितीमध्ये जवळपास 16 हजार क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली .व कमीत कमी दोनशे रुपये दर मिळाला. व जास्तीत जास्त हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला म्हणजे सात दिवसात येवल्यात बाजार भाव 400 रुपयांनी घसरले आहेत. आज नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये एक लाखाहून अधिक कांद्याची आवक झाली.
तसेच पिंपळगाव बाजार समितीमध्ये 9325 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. इथे कमीत कमी 400 ते जास्तीत जास्त तेराशे 14 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे व सर्वसाधारण 1175 रुपये इतका दर मिळाला आहे.