Pik Vima latest update : शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे मराठवाड्यात महाराष्ट्रात सरासरी पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे तथापि पिक विमा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. कारण त्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळू शकते. या प्रकरणाच्या संदर्भात सरकारने 18 सप्टेंबर 2023 रोजी एक नवीन जीआर जाहीर केला आहे.
विमा कंपन्यांना ६१ कोटी ९२ लाख 35 हजार 981 रुपयांचे वितरण महाराष्ट्र शासनाने अधिकृत केलेले आहेत या कृतीमुळे शेतकऱ्यांना त्यांचा पिक विमा येऊ शकतो महाराष्ट्रात सरकारने पाच विमा कंपन्यांना सहकार्याने पीक विमा कार्य स्थापन केले आहे 2022 23 च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल विमा योजना अंतर्गत पिक विमा काढलेला होता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या मार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना संरक्षण दिले जाते.
शेतकऱ्यांना मिळाला नुकसान भरपाई
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून पिक विमा द्वारे नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. शेतकऱ्याच्या मागणीला प्रतिसाद देत भारतीय कृषी विमा कंपनीने या विम्याचे विनंती केली आहे परिणामी खालील विमा कंपन्यांचे निधी वाटप केले जाणार आहे.
या विमा कंपन्यांचा निधी वितरित
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (United India Insurance Company)
- ICICI लुम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी
- एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी
- बजाज अलीयानझ जनरल इन्शुरन्स कंपनी
- भारतीय कृषी विमा कंपनी
वर दिलेल्या पाच ही विमा कंपन्यांना 61 कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयांचा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा वितरित करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे.