Pik Vima | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून प्रलंबित असलेले पिक विमा 15 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. बहुप्रतिक्षित असलेला खरीप 2023 चा पिक विमा ची रक्कम राज्यातील सोयगाव तालुक्यामधील 22524 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 एप्रिल पासून जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पिक विम्याची पहिल्या टप्प्यात रकमेचा लाभ मिळणार आहे.
तसेच पोर्टलवर नुकसानीची 72 तासात तक्रार न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पिक विमा कंपनीने वगळलेले आहेत. ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीप पिक विमा पासून दुसऱ्या टप्प्यात मे महिन्याचे कार्य सातवा जून महिन्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोयाबीनचे भाव गेल्या तळाला उत्पादन खर्चही हाती पडेना दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामध्ये शंभर टक्के पिक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केलेली आहे.
तसेच या पिक विम्याची पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन तक्रार केलेल्या 22 हजार 524 शेतकऱ्यांनाच यात समावेश केला जाणार आहेत. यानंतर पिक विमा कंपनीने एकाच गटातील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले गेलेले आहे.
पिक विमा कंपन्याकडून सामूहिक क्षेत्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती न दिल्याने व महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्रांमध्ये लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मधून अपत्र करण्यात आले असल्याचे पत्र देखील दिले आहे. परंतु याबाबत पीक विमा कंपनीला उलट टपाली पत्र देऊन अपात्रेची ठोस कारवाई करण्या असे पत्र देखील देण्यात आलेले आहे.