PIK VIMA : शेतकऱ्यांनो पिक विमा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PIK VIMA : नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये 20 ते 21 दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे यामुळे शेतकरी मित्र चिंतेत असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे आता जिल्हा अधिकारी यांनी अधिसूचना काढून मीड सिझनचा पिक विमा (pik vima 2023 ) लागू करू शकतात. अशी दाट शक्यता आहे.

pik vima yojna 2023 : महाराष्ट्र मध्ये पाऊस न पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे यासाठी शेतकऱ्यांनी महसूल मंडळात शेतकऱ्यांची पीक नुकसान ची पूर्व सूचना देण्याची काही गरज नाही तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक नुकसानीची पूर्वसूचना देऊ नये व ती ग्राहक धरण्यात येणार नाही फक्त जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत सूचनेद्वारे मध्य हंगाम म्हणजे मीड सीजन ( mid season) पिक विमा लागू होतो.

हे पण वाचा: बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळणार 51 हजार रुपये अनुदान त्वरित अर्ज करा

कृषी विभागाने पावसाचा खंड पडलेले महसूल मंडळे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून देणार आहे व त्यांना अधिसूचना काढण्याबाबत विनंती करू शकतात. आता गरज आहे सत्तेत असल्याने त्यांनी जिल्ह्याला अधिकारी यांच्यासोबत मीटिंग घेऊन सत्य परिस्थितीनुसार अधिसूचना काढून विनंती करावी ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे व सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळ मध्ये 21 दिवसापेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड आहे. करपलेल्या पिकांचे फोटो स्थानिक पेपरच्या बातम्या पुरावे म्हणून धरले जातात.

जर अधिसूचना जाहीर झाल्यानंतर पाऊस पडला तर पिक विमा ग्राहक धरण्यात येतो कारण तितक्या दिवसांचा खंड पडल्यामुळे नुकसान झालेले असते तसेच उत्पादनात घट धरण्यात येते. जर पीक काढण्याचे वेळेस अतिवृष्टी झाली तर परत नुकसान झाल्यास शेतकरी पुन्हा 72 तासांच्या आत पिकनिक्षणीची पूर्व सूचना देऊ शकतात व पंचनामा नंतर पिक विमा मिळवता येतो.

कापूस, उडीद, तूर, मूग, सोयाबीन, या सर्व पिकांसाठी अधिसूचना काढावी यासाठी शेतकऱ्यांनी आता सत्ताधारी नेत्यांकडे आग्रह धरला पाहिजे. या महिन्यांमध्ये किमान सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे आता तरी शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे.

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेती विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!