Pension Scheme : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात असतात ज्याद्वारे गरीब वर्गातील लोकांना या योजनेचा फायदा होतो. सध्या उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकारकडून श्रमयोगी मानधन योजना राबवली जात आहे छोट्या नोकऱ्या करणारे लोकांना यातून खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केल्यास वयाच्या साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल यामध्ये अर्ज करून तुम्हाला फक्त 55 रुपये महिना जमा करावा लागणार आहे.
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत दुकान मालक, व्यापारी हॉटेल, मालक,राईस मिल वर्कशॉप मालक, रियल इस्टेट, छोटे दुकानदार इत्यादी लोक या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी काही नियम व अटी बनवलेले आहेत.
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमचं बचत खातं आणि आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे वय 18 ते 40 वर्षे इतके असावे तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेमध्ये तुम्हाला तीन हजार रुपये महिना पेन्शन मिळणार आहे. जर या योजनेत लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा पेन्शनचा मूळ भाग मिळतो यासाठी पत्नी किंवा पतीचा वारसदार लावण्यात अत्यंत आवश्यक आहे.
या योजनेत अर्ज करण्यासाठी www.maandhan.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यानंतर होम पेजवर लॉगिन करा व सेल्फ एनरोलमेंट या पर्यायावर क्लिक करा हे केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे दिलेल्या पर्यायावर भरा नंतर प्रोसेस या बटनावर क्लिक करावे लागेल ही सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला कामगार कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागेल.
अंमलबजावणी अधिकारी नवनीत कुमार यांनी सांगितले की कमी उत्पन्न असलेल्या आणि बेरोजगामुळे उदरणीय करणाऱ्या बेरोजगारांसाठी ही योजना आहे व यांनाही अत्यंत महत्त्वाची ठरणारी योजना आहे म्हातारपणीच्या काळात आधार देण्यासाठी या योजनेचा आधार मिळू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन प्रक्रिया सोबतच कर्मचाऱ्यांना थेट कार्यालयात जाऊन या महत्त्वाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो.