Panjabrav Dakh : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. यंदा मान्सन ने दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला आहे. जवळपास राज्यातील सर्वच भागांमध्ये मान्सूनने एंट्री केली आहे. राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आलेला आहे.
एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा, 100% प्रूफ सहित पहा यादी
हवामान तज्ञ कडून देखील यावर्षी चांगला पाऊस होणार असे व्यक्त केले. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील पावसा संदर्भात एक माहिती दिली आहे. पंजाब डख एक हवामान अभ्यासक आहेत. जे नेहमी शेतकऱ्यांसाठी हिताचे व अचूक असा हवामान अंदाज देतात.
या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर, काय आहे कारण जाणून घ्या
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये आज आणि उद्या भाग बदलत पाऊस पडणार आहे. राज्यामध्ये सध्या तरी पावसाला कुठेच खंड पडणार नसल्याची माहिती पंजाबराव यांनी यावेळी दिली.
15 ते 22 जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस
विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या भागात तडाका; राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे 15 ते 17 जून पर्यंत राज्यात कमी पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भामध्ये 15 जून पर्यंत चांगला पाऊस पडेल त्यासोबत मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील पावसाची शक्यता यावेळी त्यांनी वर्तवलेली आहे.
या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोलापूर, बीड, सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच किमती चार दिवसांमध्ये सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, जालना, अकोला, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या काळामध्ये नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देखील वर्तवण्यात आलेली आहे