Onion Farmers Relief : महाराष्ट्र शासनाने कान उत्पादक शेतकऱ्यांना आधार दिला आहे एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विक्री केलेल्या कांदा साठी 350 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता या अनुदानात उतरण्याचा पहिला टप्प्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वितरण करण्यात आला.
पहिल्या टप्प्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये इतका निधी वितरण केल्या जाणार आहे. व उर्वरित अनुदान निधी वितरणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
हे पण वाचा: आता घ्या शेळीपालनासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज इतके असेल व्याजदर पहा संपूर्ण माहिती
काना अनुदानाची दहा कोटींपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या रायगड, नागपूर, सांगली,सातारा, ठाणे, बुलढाणा, अमरावती, वर्धा , चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, जालना ,अकोला व वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात येणार आहे.
कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले उस्मानाबाद, नाशिक, पुणे ,सोलापूर ,औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, धुळे, बीड, कोल्हापूर, या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्प्यात प्रत्येकी दहा हजारापर्यंत अनुदान जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांची दहा हजार पर्यंतचे देगा आहे त्यांचे पूर्ण अनुदान जमा होणार आहे तर ज्या लाभार्थ्याची देयक दहा हजारांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये एवढे अनुदान जमा होणार आहे.
हे अनुदान राज्य सरकारच्या वतीने लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. व ज्या शेतकऱ्यांचे दहा हजारांपेक्षा जास्त अनुदान आहे त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान मिळणार आहे व पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.
अशाच शासन निर्णय व शेती विषयक योजना माहिती पाहण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये माहिती मिळेल व तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.