Onion Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याची निर्यात बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर मिळाला आहे. आज झालेल्या बाजारात 1800 ते 2100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. मागील आठवड्यात सरासरी 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र भावात वाढ झाल्यामुळे कांद्याची आवक देखील वाढली आहे.
दररोज कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारने घातलेल्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घसरले होते. तुम्ही भावाने कांदा विकावा लागत होता. निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना कांदा खूपच कमी भावात करावा लागत होता. काही बाजार समितीमध्ये शेतातून काढलेल्या कांद्याची दुसऱ्याच दिवशी विक्री केली जात असते. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव वाढणे खूप गरजेचे असते. मात्र आता कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवल्यामुळे क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी दर वाढले आहेत.
सेवानिवृत्ती नंतर तुमच्या पैशाची या योजनेत गुंतवणूक करा! म्हातारपण मजेत जाईल
निर्यात बंदी उठल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्यात बंदी उठतात कांद्याचे भाव 500 ते 750 रुपये प्रतिक्विंटल ने वाढले आहेत. आज राज्यातील सरासरी कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. जो मागील काही दिवसापूर्वी 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. कांद्याला भाव कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. मात्र आता खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजारात विक्रीसाठी काढला आहे.
पिवळे सोने उजळले..! सोयाबीनची आवक आणि दर वाढले, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव
शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने साठवून ठेवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे बाजारात आवक अधिक वाढण्याची शक्यता आहे. निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. कांद्याचे भाव खूपच कमी होऊन शेतकरी अडचणीत सापडला होता. आज झालेल्या बाजारात राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे. त्यासोबतच कांद्याच्या भावात देखील थोड्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. Onion Price Today
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
धन्यवाद..!
2 thoughts on “निर्यातबंदी उठल्यामुळे कांदा उत्पादकांना फायदा! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव”