Onion Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याचा प्रश्न बिकट होत चालला असताना बाजारभावामुळे शेतकरी नाराज होते. यात बदल होताना पाहायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीत कांद्याचे दर 1700 ते 1800 रुपये सरासरी आहेत. मात्र महिन्याभरापूर्वी 900 ते 1000, 1100 अशा बाजारभावाने कांदा विक्री सुरू होती. आजच्या मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नांदगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1850 रुपये बाजार भाव मिळाला आहे.
आज मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार 35 पेक्षा जास्त बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झाली आहे. आज लाल कांद्यासोबतच लोकल, नंबर एक, पोळ, उन्हाळा कांद्याची आवक झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या दिवसातील सर्वाधिक दर 1850 रुपयाचा भाव लालसगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला मिळाला आहे. आज सर्वाधिक 18000 क्विंटलचे पुणे बाजार समितीमध्ये झाली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत आज कांद्याच्या व घटल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बाजार भाव देखील वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले आहे.
लालसगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7635 क्विंटलचे आवक झाली आहे. या ठिकाणी सरासरी दर 1850 रुपये मिळाला आहे. तर उन्हाळी कांद्याची आवक 1215 क्विंटल झाली आहे. उन्हाळी कांद्याला सरासरी 1750 रुपये बाजार भाव मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक दर 2000 रुपये हा लोकल कांद्याला मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वात कमी म्हणजे सरासरी 900 रुपयांचा बाजारभाव पुणे मोशी बाजार समितीत मिळाला आहे.
बाजारात उन्हाळी कांद्याचे आवक वाढली | Onion Price Today
या दरम्यान लालसगाव बाजार समितीत आज उन्हाळी कांद्याची 1220 क्विंटल झाली आहे. सरासरी 1750 रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे. पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळा कांद्याची 400 क्विंटल ची हवा झाली आहे. या कांद्याला सरासरी 1700 रुपयांचा बाजार भाव मिळाला आहे. देवळा बाजार समितीत देखील उन्हाळी कांद्याची 280 क्विंटल झाली आहे. या कांद्याला सरासरी 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
पहा आज कोणत्या बाजार समितीत किती मिळाला दर?
- कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची 4400 क्विंटल आवक झाली आहे तर या ठिकाणी कमीत कमी दर 600 रुपये ते जास्तीत जास्त दर 1900 रुपये व सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
- छत्रपती संभाजी नगर बाजार समितत 2740 क्विंटल आवक झाली आहे, या ठिकाणी कमीत कमी दर 600 रुपये ते जास्तीत जास्त दर 2200 रुपये व सरासरी दर 1400 रुपये मिळाला आहे.
- मुंबई कांदा बटाटा मार्केट बाजार समिती 8920 क्विंटल कांद्याचे आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी दर 1300 रुपये ते जास्तीत जास्त दर 1900 रुपये तर सरासरी दर 1600 रुपये मिळाला आहे.
- खेड चाकण बाजार समिती 175 क्विंटल कांद्याचे आवक झाली असून कमीत कमी दर 1400 ते जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये व सरासरी दर 1700 रुपये मिळाला आहे.
- राहता बाजार समिती 2110 क्विंटल कांद्याच्या आवक झाली असून कमीत कमी दर 600 रुपये ते जास्तीत जास्त 2200 रुपये व सरासरी दर 1500 रुपये मिळाला आहे.
- येवला बाजार समिती 3000 आवक झाली असून कमीत कमी दर 400 रुपये ते जास्तीत जास्त दर 1870 रुपये व सरासरी दर 1500 रुपये मिळाला आहे. Onion Price Today
- लालसगाव बाजार समिती 7633 आवक झाली असून कमीत कमी दर 900 रुपये ते जास्तीत जास्त दर 1980 रुपये व सरासरी दर 1840 रुपये मिळाला आहे.
- पुणे बाजार समिती 18310 आवक झाली असून कमीत कमी दर 600 रुपये ते जास्तीत जास्त दर 1800 रुपये व सरासरी दर 1200 रुपये मिळाला आहे.
- चाळीसगाव बाजार समिती 3500 आवक झाली असून कमीत कमी दर 700 रुपये ते जास्तीत जास्त दर 1830 रुपये व सरासरी दर 1650 रुपये मिळाला आहे.
- पिंपळगाव बसवंत बाजार समिती 13000 आवक झाली असून कमीत कमी दर 400 रुपये ते जास्तीत जास्त दर 1970 रुपये व सरासरी दर 1750 रुपये मिळाला आहे.
हे पण वाचा:-महाराष्ट्रातील मार्च महिन्यामध्ये साखरेच्या कोट्यात 12% वाढ, थकबाकी होण्यास मदत होणार
2 thoughts on “कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कांद्याच्या भावात झाली वाढ, पहा आजचे बाजार भाव”