Onion Market Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, निर्यात बंदीमुळे साध्या कांद्याचा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर आहे. अशातच आता 31 मार्चनंतर ही कांद्याची निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शेतकऱ्याकडून पाच लाख टन कांदा देशात राखीव साठ्यासाठी खरेदी करणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे आज कांदा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात कांद्याला किमान भाव 1,2 रुपये प्रति किलो मिळत होता. पण आज कांद्याला बाजार समितीमध्ये किमान 5 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. अर्थातच कांद्याच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. कांदा बाजार तज्ञ यांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या काळात कांद्याचे दर आणखीन सुधारण्याची शक्यता आहे.
दररोज कांद्याचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जास्तीत जास्त 23 रुपये प्रति किलो कांद्याला भाव
महाराष्ट्र राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 23 रुपये प्रति किलो बाजार भाव मिळाला आहे. तर सरासरी कांद्याला 15 रुपये किलो पर्यंत दर मिळाला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर शेतकऱ्यांना किमान 30 रुपये प्रति किलो भाव मिळाला असता. सरकारच्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी. जर निर्यात बंदी हटवली नाही तर आणखीन किती दिवस शेतकऱ्याने तोट्यात शेती करीत राहावे? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने द्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
कांद्याच्या दरावर निवडणुकीचा प्रभाव
सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून शेतकऱ्याचा रोज कमी व्हावा तसेच शेतकऱ्याची मते मिळवण्यासाठी कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशा लोकांना धडा कसा शिकवायचा? याबाबत रणनीती बनवण्याचे काम संघटनेची कोर कमिटी करत आहे.
स्वप्नातील घर बांधणे आता सोपे झाले आहे…! लोखंड व सिमेंटच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर
पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव | Onion Market Today
- सोलापूर बाजार समितीत आज 14 हजार 780 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 2300 ते कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- पुणे बाजार समितीत आज 16260 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 1800 ते कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- चांदवड बाजार समितीत आज 5200 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 1630 ते कमीत कमी 1220 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- कळवण बाजार समितीत आज 7200 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 1650 ते कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- लासलगाव बाजार समितीत आज 9450 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 1630 ते कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1570 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज 8520 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 1700 ते कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- मुंबई बाजार समितीत आज 9820 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, जास्तीत जास्त 1700 ते कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
3 thoughts on “कांद्याच्या दरात वाढ; आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचा कांदा बाजार भाव”