गुड न्यूज! कांदा बाजार भावात मोठी वाढ, पहा कुठे मिळतो विक्रमी भाव?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सहा देशांना कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने बांगलादेश, युएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांचा समावेश आहे. या सहा देशांना कांदा निर्यात केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे.

आजचा कांदा बाजार भाव पाण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र सरकारच्या या निर्णयावर काही लोक आरोप करत आहेत. काही लोकांच्या मते सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळपिक करत आहे. केंद्र सरकारने 99150 मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तसेच त्यादि भारत सरकारने 2000 मॅट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. एकंदरीत आता देशातून एक लाख मॅट्रिक टन पेक्षा जास्त कांदा निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

या सर्व गोष्टींचा शेतकरी व्यापारी आणि निर्यातदार यांना कोणताच फायदा होणार नाही असा आरोप कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केला आहे. अशातच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज राज्यातील काही बाजारामध्ये कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत आपण राज्यातील प्रमुख बाजारामध्ये कांद्याला किती भाव मिळतोय याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण..! सोने खरेदी करणारे खूश, पहा 10 ग्रॅम सोन्याचे दर

कुठे मिळत आहे विक्रमी भाव?

कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लोकल कांद्याला कमीत कमी 1500 तर जास्तीत जास्त 2500 आणि सरासरी,1800 रुपये भाव मिळाला आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1000 रुपये जास्तीत जास्त 2200 आणि सरासरी 1700 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये जास्तीत जास्त 2100 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. चंद्रपूर गजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी 1000 तर जास्तीत जास्त 1850 आणि सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याला कमीत कमी 400 तर जास्तीत जास्त 1990 रुपये आणि सरासरी 1450 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. Onion Market Price Today

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “गुड न्यूज! कांदा बाजार भावात मोठी वाढ, पहा कुठे मिळतो विक्रमी भाव?”

Leave a Comment

error: Content is protected !!