Onion Market in Maharashtra | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी येत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक कमी झाल्याने बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे. कांदा निर्यात बंदी नंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
आज झालेल्या लिलावामध्ये कांदा बाजार भाव दुपटीने वाढले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात घटली त्यामुळे कांदा बाजारात काहीशी वाढ झालेली आहे. शनिवारी केवळ 4080 गाड्या कांदा मार्केट यार्ड विक्रीसाठी आल्या होत्या.
सलग येणाऱ्या सुट्ट्या आणि वाढलेले कांद्याचे उत्पादन यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची मोठी आवक झालेली होती. बाजार समितीमध्ये तब्बल 1450 कांदा विक्रीसाठी आल्याने बाजार समितीमध्ये पाय ठेवला देखील जागा उरलेली नव्हती.
शेवटी व्यापाऱ्यांना जनावराच्या बाजारात कांद्याचे गोणी उतरून घ्यावा लागल्या. त्यानंतर गुरुवारी बाजार भाव पुन्हा एकदा घसरले. कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी चक्क कांदा रस्त्यावर फेकून देऊन शासनाचा जाहीर निषेध केला.
गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये 700 ते 1100 रुपये पर्यंत दर घसरले होते त्यानंतर आवक वाढल्याने भावात घसरला चा परिणाम दिसून आला. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी घाई करायचे नाही असा निर्णय घेतलेला होता हा परिणाम असल्याचेही सांगितले जात आहे परिणामी कांद्याचे दर पंधराशे नव्वद रुपयांनी वाढले आहेत.
याच कारणामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये चांगला दर मिळाला आहे. परंतु पुन्हा एकदा कांद्याचे बाजार समिती आवक झाल्यानंतर दर घसरणार असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. परंतु कांद्याचे भाव वाढणार का याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कांद्याचे दर किंचित वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.