Onion Market | कांदा हे सर्वांसाठी एक अविभाज्य घटक बनले आहे. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत स्वयंपाकातील एक महत्त्वाचे घटक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. कांद्याचा देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. हेच महत्त्वाचे कारण आहे की आपल्या देशात कांद्याची लागवड सर्वाधिक जास्त केली जाते.
भारतामध्ये एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या विविध भागात या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते. जर आपण पाहिले तर नाशिक जिल्ह्याचा राज्याच्या एकूण उत्पादनात सर्वात जास्त वाटा आहे. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात 70 टक्के उत्पादन होते.
महाराष्ट्रामध्ये कांदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते जवळपास 25 ते 26 जिल्ह्यांमध्ये कांदा हे पीक उत्पादित केले जाते. परंतु असा असतानाही कांदा बाजारात सातत्याने लहरीपणा पहिला मिळत आहे. केंद्र सरकारकडून निर्यात बंदी बाजारामध्ये चढउतार तसेच अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
सध्याच्या घडीला काही बाजारामध्ये कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मात्र बऱ्याच वेळेस शेतकऱ्याचा मालाला हमीभाव अपेक्षा कमी दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांच्या मोठी आर्थिक कोंडी होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला होता. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजार भाव कांदा साठ रुपये प्रति किलो पर्यंत विकला गेला.
तसेच दर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरती निर्यात बंदीचा निर्णय घेतला. या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. 7 डिसेंबर 2024 पर्यंत निर्यात होणार नाही त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर दुसऱ्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे.
शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरची निर्यात बंदी हटवली पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आशिया खंडामधील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेली लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल खाली आले आहेत.
विशेष म्हणजे मीडिया रिपोर्ट मध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या किरकोळ बाजारात आले असल्याने सरकार कांदा निर्यात बंदी हटवणार असे वृत्त वेगाने वायरल होत आहे.
त्यात पार्श्वभूमीवर केंद्र केंद्र सरकार खरंच हा निर्णय घेणार का आणि शेतकऱ्यांना दिलासा देणार का सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यात पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काढलेली बाबत मोठी अपडेट दिली आहे.
केंद्रीय मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार तांदूळ, गहू, कांदा साखर यांच्यावर सध्या सुरू असलेल्या बंदी उठण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकार विचार करत नाही. म्हणजे कांदा निर्यात बंदी ३१ डिसेंबर 2024 पर्यंत उठणार नाहीये जवळपास स्पष्ट झालेली आहे.
यात निर्णयाचा मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अशा परिस्थितीमध्ये शासन निर्णय घेईल अशा चर्चा रंगत होत्या. परंतु केंद्रीय मंत्र्यांनी दिलेले माहिती नुसार ही शक्यता नाकारली आहे.