Onion Market | शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी येत आहे.मागच्या तीन महिन्यापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार वरती रोष व्यक्त केला होता जागोजागी शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद पाडले होते. परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून खांद्यावरची निर्यात बंदी उठवली आहे.
हाती आलेल्या वृत्तामध्ये तीन लाख मॅट्रिक टन निर्यातीला मंजूर देण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय वृत्तवाहिनी यांनी दिली आहे. परंतु या संदर्भातील केंद्र सरकारच्या अधिकृत निर्णयाची प्रत समोर आलेली नाही.
देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
कांद्याचे दर मागच्या काही महिन्यापूर्व गगनाला भेटले होते. याच दरावरती नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आठ डिसेंबर 2023 रोजी कांद्यावर निर्यात बंदी लावली होती. ही निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत असेल असे परकीय व्यापार महासंचालना यावेळी सांगितले होते.
तर ते आधी निर्यातीवर 40% शुल्क वाढ केल्यामुळे शेतकरी मोठे चिंतेत होते पण निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर जमीनदोस्त झाले. अजून दर कोसळलेलेच आहे निर्यात बंदी उठल्यानंतर कांद्याच्या दर वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
केंद्र सरकारने आठ डिसेंबर 2023 रोजी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. परंतु आता कांद्याला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगली मागणी आहे पण देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुकडा नसल्याने कांद्याचे दर पडले होते.
परंतु आता निर्यात बंदी उठवल्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली होणार आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याचा तुटवडा असल्यामुळे भारतीय कांद्याला मोठा दर मिळेल अशी अपेक्षा आहे.
कांद्याचे दर इतक्या रुपयांनी वाढणार
निळक बंदी उठवल्यामुळे बाजारामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल नक्की दर किती वाढ होईल हे सांगता येणार नाही कारण निळा त्यावर असलेली 40% शुल्क कमी होणार का कोणत्या कांद्यावरील निर्यात बंदी ठेवली या संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.