अखेर मुहूर्त ठरला ! या तारखेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Narendra Modi Prime Minister | देशभरामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे या निकालामध्ये इंडियाला बहुमत मिळालेले आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा आता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. परंतु बीजेपी पक्षाला एकहाती बहुमत मिळालेले नसल्यामुळे मित्र पक्षांसोबत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करावी लागणार आहे. Narendra Modi Prime Minister

याच बाबत राजकीय स्तरावरती मोठ्या घडामोडी घडतांना दिसत आहेत. नितेश कुमार हे आता गेमचेंजर ठरणार आहेत. परंतु याबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. येत्या आठ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असे वृत्तसमोर आलेले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बीजेपी ला एकहाती बहुमत न मिळाल्यामुळे मित्र पक्षांबरोबर सत्ता स्थापन करावे लागणार आहे. त्यानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तसेच या बैठकीमध्ये 17 वी लोकसभा विसर्जित देखील करण्यात आले. येत्या 16 जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ असणार आहे. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींच्या हवेली केला.

आता पुन्हा एकदा सात जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून या बैठकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच नरेंद्र मोदी ही पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपी ला अपेक्षित अशी यश मिळाले नाही .परंतु एनडीएला 239 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. राजकीय घडामोडींचा वाढता विवेक बद्दल नरेंद्र मोदी ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन सरकार स्थापन करणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!