MPSC Job Recruitment | सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे? जाहिरात कधी येणार याची वाट पाहत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC न तब्बल 937 पदांसाठी मोठी भरती जाहीर केलेली आहे. आणि तरुणांच्या डोळ्यातील स्वप्न असल्याने सरकारी नोकरीची ही मोठी संधी सध्या उपलब्ध झालेली आहे. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेची तयारी करत आहेत आणि या वेळेची जाहिरात तर महाराष्ट्रात सर्वात मोठी भरतींपैकी एक ठरणार आहे. MPSC Job Recruitment
या भरती मधून महाराष्ट्र शासनाचे विविध विभागातील पद भरले जाणार असून, गट क सेवा संयुक्त परीक्षा 2025 ही 4 जनवरी 2026 रोजी राज्यातील तब्बल 37 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. अर्ज प्रक्रिया 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025 दरम्यान आहे. तर यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. आयोगाने अर्ज प्रक्रियेत काही नवीन बदल केले आहेत, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सर्व कागदपत्र नीट व्यवस्थित प्रकारे तपासून भरावीत, असं सल्ला देण्यात आलेला आहे.
या पदांची भरती होणार
– उद्योग निरीक्षक – 9 पदे
– तांत्रिक सहाय्यक – 4 पदे
– कर सहाय्यक – 73 पदे
– लिपिक टंकलेखक – 852 पदे
वरील दिलेल्या सर्व पदांसाठी 63 हजार ते एक लाख रुपये बेसिक पगार असेल. म्हणजेच ही नोकरी मिळाल्यास केवळ स्थिर करियरच नव्हे तर प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्यत दोन्ही मिळणार आहे. .
परीक्षेचा आपण सुरू पाहिलं तर ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी, मराठी, सामान्य विज्ञान या विषयावर विचारले जातील. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाईल. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून तयारी करणे अत्यंत आवश्यक मानलं जातं.
तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर कोचिंग क्लासेस मध्ये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या जाहिरातीची चर्चा रंगली आहे. हीच ती वेळ आहे मेहनत करायची आणि आयुष्यभरासाठी सरकारी नोकरी व आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तरुणांसाठी हीच सुवर्णसंधी आहे त्यासाठी लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करा.
हे पण वाचा | DRDO Requirement 2023