Monsoon Updates In Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके करपू लागले आहेत गेल्या काही दिवसात शेतकरी राजा मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. अशी परिस्थिती असताना राज्यात ऑगस्ट च्या राहिलेल्या दिवसांमध्ये पाऊस नसून सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात येईल इनोचा प्रभाव पाहायला भेटतोय. त्याचा परिणाम सप्टेंबर मध्ये होईल, तसेच राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. येणाऱ्या दहा दिवसात शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे असे हवामान खात्याने आवाहन केले आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसालीकर कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात पेरण्या जूनच्या अखेरीस झाला आहे. कारण जून मध्ये अपेक्षित असा पाऊस नव्हता. अनेक शेतकऱ्यांची पिके वर आले आहे. मात्र पिकांना पाणी कमी पडत आहे. या पिकांना आता पाण्याची गरज आहे. काही भागात हलका व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे मोठ्या पावसाची शक्यता कुठेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची स्वतःहून शेततळे किंवा इतर माध्यमातून नियोजन करावा लागणार आहे.
Monsoon Updates In Maharashtra:-
जुलै मध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसत होता मात्र आता ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडला आहे गेल्या वीस दिवसांमध्ये राज्यात अपेक्षाप्रमाणे पाऊस पडला नाही. विदर्भ व कोकणात चांगल्या सरासरी पाऊस आहे मराठवाडा व मध्य महाराष्ट्र सरासरी पेक्षा कमी पाऊस आहे.
राज्यात सात टक्के तुटीचा पाऊस. त्याचबरोबर पुढील दहा दिवस पावसाच्या कोणत्याही प्रकारे तीव्र इशारे दिसत नाहीत. पुढील येणाऱ्या आठ दहा दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल, सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या काळात पावसाची शक्यता जास्त आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 11 जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा 25 टक्के कमी पाऊस पडला. सातारा, सांगली, सोलापू, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती व अकोला या जिल्ह्यामध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती काळजी जनक बनली आहे.
हे पण वाचा :-