Monsoon Update: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्र मध्ये कधी येणार पहा तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update | शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सून अंदमान मध्ये दाखल झालेला आहे. अंदमान मध्ये दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल लगेच केरळ कडे सुरू होते. अंदमान मधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळ पर्यंत पोहोचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. Monsoon Update

उनाच्या घामाघुम झालेल्या शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी चांगली बातमी समोर आलेली आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरलेला दिसत आहे. मान्सून 21 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची लगबगिने शेतीचे काम सुरुवात झाली आहे. ही बातमी बळीराजासाठी मोठी महत्त्वाची आनंदाची ठरली आहे.

मे महिना सुरू झाला म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाटचाल सर्वच जण पाहत असतात. यंदा मान्सून अंदमान निकोबार मध्ये वेळेआधी येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. भारतीय हवामान खात्याने 19 मे रोजी अंदमान मधील मान्सून आगमनाची तारीख दिली होती. त्यानुसार अंदमान मालदीव कोमोरींच्या काही भागांमध्ये दाखल झालेला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये काही भागात मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमान मध्ये पाऊस सुरू झालेला आहे. या संदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केलेले आहे. दरवर्षी अंदमान मान्सून 22 मे पर्यंत दाखल होत असतो परंतु यंदा मान्सून हा तीन दिवस आधीच आल्यामुळे यंदा महाराष्ट्र मध्ये लवकर मान्सूनचे आगमन होणार आहे. असे देखील सांगण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल झालेला आहे. व त्याची वाटचाल आता केरळकडे सुरू राहणार आहे. अंदमान मधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळ पर्यंत पोहोचण्यासाठी दहा दिवस लागतात मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर 31 मे पर्यंत मान्सून हा केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

तसेच 19 आणि 20 मे रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केळ मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी केरळ मध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 21 मे 2024 रोजी 204.5 मी मी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मेघालयात 19 आणि 20 मे रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Leave a Comment