Monsoon Update: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे याबद्दल हवामान विभागाने मोठे अपडेट दिली आहे. मान्सून राज्यात वेळ यादी दाखल झाला असला तरी आता मात्र मान्सूनचा वेग मंदावला असल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सून काहीसा थांबला असून त्यात प्रगती झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आजही राज्यातील काही ठिकाणी जोरदार मान्सूनचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांनी पाऊस पडत नाही या चिंतेने पेरणी करणे थांबवून नका. राज्यात पुन्हा एकदा जोरदार मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस ते मेघगर्जना सह पावसाची शक्यता आज हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यासोबतच सामान्यतः आकाशात ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 26 अंश च्या आसपास असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोकणामधील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी सोसाट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने आणि हलका ते मध्यम आकाराचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. Monsoon Update
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रयोग ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मध्यम आकाराचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यासोबतच या ठिकाणी येलो अलर्ट देखील जारी केले आहे.
राज्यातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज येल्लो अलर्ट जारी केलेले असून येथे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत जोरदार मान्सूनचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.