Millet Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या उन्हाळी हंगामातील बाजरी काढण्याची लगबग सुरू आहे. शेतकरी कामात व्यस्त आहेत. उन्हाळी भुईमूग व बाजरी रब्बी हंगामातील हे शेवटचे पिके असतात. सध्या बाजरी या पिकाला हवा तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत दिसत आहेत. मात्र तरीही मका आणि ज्वारीपेक्षा बाजरीला प्रति क्विंटल 250 रुपयांनी भाव जास्त आहेत.
उन्हाळ्यात तीव्र तापमानात येणारे बाजरी पीक असल्याने शेतकरी दोन पैसे मिळवण्यासाठी तिसरे पीक म्हणून बाजरीला पसंती देतात. मात्र तीव्र होऊन असल्यामुळे बाजरी कापणी व काढण्यासाठी मजूर सहजासहजी मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी मुद्रण बाजरी काढण्यासाठी गुटच देत आहे. यामध्ये मजुराचा फायदा होत असल्याचा दिसून येत आहे.
अनेक शेतकरी एप्रिल महिन्याच्या शेवटी बाजरीचे उत्पन्न घेऊन शेत नांगरटी करणे ट्रेलर करणे यासाठी लवकर जमीन मोकळी करण्यासाठी लवकर बाजरी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 25 मे नंतर पुन्हा संकरित कापसाच्या लागवडीची लगबग सुरू होणार आहे. म्हणून आता शेतकऱ्यांची शेताची मशागत करून ठेवणे व शेणखत टाकण्याचे कामे जोरात सुरू आहेत.
सध्या बाजरीला किती भाव मिळत आहे?
महाराष्ट्र राज्यातील उन्हाळी बाजरीला सध्या दोन हजाराच्या वर भाव मिळत आहे. सध्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीची आवक वाढली आहे. चोपडा तालुक्यातील बाजरीची लागवड 800 हेक्टर क्षेत्रावर केली गेली होती. चोपडा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज जवळपास 450 ते 500 क्विंटल बाजरीची आवक होत आहे. या ठिकाणी कमीत कमी 2230 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 2350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजरीच्या तुलनेत मका पिकाची दर पाहिले तर मकाला केवळ 1800 रुपये प्रति क्विंटल ते 2000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. म्हणून मका आणि ज्वारीच्या तुलनेत बाजरी पिकाला चांगला दर मिळत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील भुईमुगाच्या ओल्या शेंगांना प्रतिक्विंटल 700 ते 800 रुपये भाव मिळत आहे. Millet Rate
पहा आजचे बाजरीचे दर
आजचे बाजरीचे दर पाहिले तर, सिल्लोड बाजार समिती सर्वसाधारण बाजरीला सरासरी 2250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. शेवगाव बाजार समितीत हायब्रिड बाजरीला 2600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अमरावती बाजार समिती 2600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. जालना बाजार समितीत हिरव्या बाजरीला 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पैठण बाजार समितीत हिरव्या बाजरीला 2640 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. माजलगाव बाजार समिती हायब्रीड बाजरीला 2560 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पुणे बाजार समिती सर्वसाधारण 3050 रुपये प्रति क्विंटल तर मिळाला आहे.