Cotton Price Today | शेतकरी कष्टाने पिकवलेले पांढरे सोने आज ना उद्या चमकेल अशा अशाने शेतकऱ्यांचे कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे. सध्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला या अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरामध्ये माल साठवून ठेवलेला आहे.
नवीन वर्ष सुरु होऊन बराच काळ उलटला आहे. पण अद्यापही कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. बळीराजांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पांढरा सोन्याला आज घडीला सात हजार रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक भाव अजून पर्यंत मिळालेला नाही.
नैसर्गिक आपत्ती, व मालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच शासनाने ही शेतकऱ्यांना मालाला हमीभाव देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही भाव वाढीची प्रतीक्षा करत आहेत. त्यांनी त्यांचे घरातच साठवून ठेवायचे तरी किती दिवस असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच घरात साठवून ठेवलेले कापसाचे शॉर्टसर्किट आग यापासून संरक्षण करताना शेतकऱ्यांची दमछाक होते आहे.
घरामध्ये साठवून ठेवलेला माल विक्री होत नसल्याने भाव वाडी साठी अपेक्षेची जागा आता चिंतेने घेतली आहे. अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षीचा कापूस अजूनही विक्री केलेला नाही. आज ना उद्या भाव वाढतील अशा अपेक्षा शेतकऱ्यांनी मनाशी बाळगून ठेवली आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची कोणती चिन्हे सध्या तरी दिसून येत नसल्याने बळीराजाच्या काळजीत भर पडली आहे.