Maharastra Rain Update: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात हवामान विभागाने मोठ्या अपडेट दिले आहे. महाराष्ट्रातील घाटमाथा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील तीन दिवसापासून या भागात जोरदार पाऊस होत आहे. या भागातील 35 मंडलात 100 मीटरहून अधिक पाऊस झाला आहे.
मागील 24 तासात नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात घटसर येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे. घाटसर येथे 475 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. तामिनी घाटामध्ये 240 मिलीमीटर, लोणावळा मध्ये 212 मिलिमीटर मुळशी मध्ये 212 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर राज्यातील पुणे, नगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला आहे.
सततच्या पावसामुळे कोकणामधील व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नद्या भरून वाहत आहेत. या परिसरातील बहुतांश धरणे भरले आहेत. त्यामुळे कृष्णा भीमा खोऱ्यातील धरणातील विसर्गात वाढ करण्यात येत आहे. या भागातील सर्व नदीकाठच्या गावातील नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. Maharastra Rain Update
मागील एक महिन्यापासून कोकण घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने धिंगाणा घातला आहे. घाटमाथ्यावर काही वेळा पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्यात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नगर मधील अकोला तालुक्यात पावसाच्या जोरदार बेटिंग पाहायला मिळाली त्यामुळे भंडारा धरण फुल भरले आहे. त्याचबरोबर मुळा धर्मातही मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
पुण्यातीलकार्ला मंडलात सर्वात अधिक 244 मिलिमीटर पाऊस पडला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. निरंतर पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पातळीत वाढ होऊ लागले आहे. पुणे जिल्ह्यातील 26 धरणापैकी आतापर्यंत जवळपास 17 धरणे भरली आहेत. या ठिकाणी 86 टक्के पाणीसाठा झाला आहे.
कोकण भागातील ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे समोर आले आहे. रायगड मध्ये बघ कुठे झाल्यामुळे सर्वात जास्त पाऊस पाहायला मिळाला आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील सर्वच नद्या भरून तुडुंब वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कोकणामधील सर्व धरणे देखील भरली असल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठवाडा व विदर्भात पाऊस किती?
मागील आठ दिवसापासून मराठवाड्यात पावसाचा जोर फार कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुला ठिकाणी पावसाचा सडा पडत आहे. विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. बुलढाण्यातील नांदेवाली चांदुरबिस्वा मंडलात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मात्र मागील काही दिवसापूर्वीच्या पावसाने या भागातील नद्या अजूनही भरून वाहत असल्याचे पहायला मिळत आहे. व त्या नद्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
1 thought on “हवामान विभागाची मोठी अपडेट! महाराष्ट्रातील या भागात कोसळणार धो-धो पाऊस…”