Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानाबाबत एक महत्त्वाची व अत्यंत काळजी लावणारी बातमी समोर येत आहे. राज्यामध्ये मान्सून सुरू होतात पावसाची ओढ दिल्याचे चित्र दिसून आले. परंतु महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाने ब्रेक घेतलेला दिसून येत आहे. पण कोकण सह मुंबई पुणे सातारा या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.
राज्यातील या भागांमध्ये मुसळधार पाऊस हवामान विभागात सविस्तर अंदाज
तसेच भारतीय हवामान खात्यान दिलेल्या माहितीनुसार 19 ते 21 जून पर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येतो पण पावसाची शक्यता वर्तमात आलेली आहे पुणे सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच उर्वरित जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने आज संपूर्ण विदर्भाला वादळी वाऱ्याचा जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला आहे यावेळी वाऱ्यांचा वेग 25 ते 50 किमी प्रति राहणारा असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये आज बहुतांशी ठिकाणी हलक्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सातारा व पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे.
कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.