Maharashtra Rain Update | राज्यातील शेतकऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तवलेला आहे, यामुळे राज्यात एक नव संकट निर्माण झालेल आहे. आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा हवामान खात्याचा हा अंदाज शेतकऱ्यांना धडकी भरवणारा आहे. महाराष्ट्रावर पावसाचा मोठ संकट उद्भवलं आहे, मागील गेले काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. शेत शिवार पाण्याखाली गेले आहेत का काहींच्या घरात पाणी शिरले तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळी झालेल आहे. Maharashtra Rain Update
पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला असून हवामान खात्याने स्पष्ट सांगितल आहे की पुणे, ठाणे, मुंबई, जालना आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांना थेट इशारा देण्यात आलाय. पुढील 24 तास नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अस प्रशासनाने आव्हान केले.
राजधानी मुंबईत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे, अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, वाहनचालक अडचणीत आले आहेत. ठाण्यात तर हवामान विभागाने आज थेट अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर सातारा, कोल्हापूरकडे ही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक ठिकाणी रस्ते तळ्यांसारखे झाले आहेत.
राज्यामध्ये मुसळधार पावसाने विश्रांती घेतली होती परंतु पुन्हा एकदा पाऊस शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान करणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या पार्श्वभूमी वरती आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजा, वादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे. मागच्या गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातील अनेक शेती पाण्याखाली गेली असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान झालेले आहे. काही काही चे शेतामध्ये काहीच उरलं नाही शेतकऱ्यांनी यापुढे कसे जगावे असा प्रश्न देखील सध्या उपस्थित झालेला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत.
तर धाराशिव जिल्हा मध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे भूम परंडा परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावात पाणी शिरले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता हवामान खात्याचा पुढचा अंदाज खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण हवामान खात्याने आज आणि उद्या मोठ्या इशारा वर्तवलेला आहे यामुळे नागरिकांनी देखील हवामान खात्याच्या या इशाराकडे लक्ष देऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे.
बातमी स्त्रोत : भारतीय हवामान विभाग
हे पण वाचा | Weather forecast: पंजाब डक यांचा हवामान अंदाज