Maharashtra Rain | राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सह देशातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत असताना शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे.
मागच्या काही दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने मोठा दणका शेतकऱ्यांना दिला आहे. दहा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली विशेष म्हणजे मध्यंतरी काही भागात गारपिट देखील झालेली आहे. यामुळे शेतीकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परंतु आत्ताच हवामान खात्याने राज्यातील हवामान बाबत मोठी अपडेट दिली आहे. म्हणजे अर्थात 18 फेब्रुवारीपासून या राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची सुरुवात होणार आहे.
अशातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार वेस्टनर डिस्टबरन्स मुळे देशातील काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाज काय माहिती दिली आपण ती थोडक्यात समजून घेणार आहोत.
हवामान विभागाचे नवीन अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील येत्या काही काळात 20 फेब्रुवारी पर्यंत पंजाब आणि पुढील दोन दिवसात 21 फेब्रुवारी पर्यंत दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्याचबरोबर लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये बावीस फेब्रुवारी नंतर मुसळधार पाऊस आणि हीमवर्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच हवामान विभागाने दिलेले अंदाज मध्ये ईशान्यकडील राजांमध्ये देखील पाऊस शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दक्षिण गुजरात, कोकण, कर्नाटक, गोवा किनारपट्टी पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. असा अंदाज दिला आहे.
याचमुळे महाराष्ट्र मध्ये हवामान अशंत ढगाळ होत आहे. याच कारणामुळे येत्या काही काळात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात कोकण वगळता अनेक भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच विदर्भ मराठवाडा सह मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.