Maharashtra Heavy Rain Update : राज्यामध्ये मान्सूनचा वेग काही दिवसांपासून मंदावल्याचा पहायला मिळत आहे. मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील येत्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मुंबईमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडणार आहे.
आज सोन्याचे दर घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर पहा
तसेच भारतीय हवामान खात्याने कोकणाबद्दल देखील हवामान अंदाज मध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेगगर्जना सह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
फक्त या लोकांना मिळणार मोफत रेशन यादीमध्ये तुमचे नाव पहा
तसेच विदर्भातील आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे.
तसेच पश्चिम विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये देखील मोठा पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. परंतु या ठिकाणी उष्णतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.
49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2500 कोटी रुपये पीक विम्याचे पैसे जमा पहा पात्र शेतकऱ्यांची यादी
तसेच काही ठिकाणी नुसता पाऊस पडणार नसून या काळामध्ये पावसासोबत वादळीवाराचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच या काळामध्ये नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.