एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण! 1 जुलैपासून लागू नवीन दर, पहा तुमच्या शहरात किती रुपयाला मिळणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, एलपीजी गॅस सिलेंडच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एक जुलैपासून गॅस सिलेंडरच्या किमती तीस रुपये घट झाली आहे. मात्र ही गट व्यवसाय सिलेंडरचे किमतीत असून घरगुती सिलेंडरच्या किमती जशास तसे आहेत. तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरला किती दर आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

तुमच्या शहरातील नवीन एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात एक जुलै रोजी बदल करण्यात आला आहे. आज एलपीजी कॅलेंडर स्वस्त झाले असून सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर 30 रुपयाने स्वस्त झाले आहेत. हे नवीन दर एक जुलैपासून लागू झाले आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली घट ही 19 किलो व्यवसाय सिलेंडरच्या किमतीमध्ये करण्यात आले आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या घटलेल्या दरात फक्त हॉटेल व्यवसायिकांचा फायदा होणार आहे. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे दर महिन्याचे एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. जुलै महिन्याच्या एक तारखेला देखील गॅसच्या दरात बदल झाला आहे. मात्र हा बदल घरगुती सिलेंडर मध्ये नसून व्यवसाय सिलेंडर मध्ये झाला आहे. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या आहेत.

CIBIL स्कोर वाढवा ‘याप्रकारे’ लगेच 0 वरून 750 पर्यंत, पहा सिबिल वाढवण्याची सोपी पद्धत

तुमच्या शहरातील सिलेंडर किती रुपयाला आहे?

  • मुंबईत व्यवसाय सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त झाले असून, सध्या 1598 रुपयाला झाला आहे. जून मध्ये त्याची किंमत 1629 रुपये होती. म्हणजे जुलै महिन्यात या सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे.
  • राजधानी दिल्लीत व्यवसाय सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तो मागील महिन्यात 1676 रुपये होता मात्र एक जुलै पासून त्याची किंमत 1646 रुपये झाली आहे.
  • कोलकत्ता मध्ये व्यवसाय सिलेंडर 31 रुपये स्वस्त झाला आहे. सध्या 1756 रुपये झाला आहे. त्याची किंमत प्रतिशिलेंडर 1787 रुपये एवढी होती.
  • चेन्नईमध्ये व्यवसाय सिलेंडर तीस रुपयांनी स्वस्त झाला असून जून मध्ये 1840.50 रुपये असणारा सिलेंडर एक जुलैपासून 1809.50 रुपये झाला आहे.

1 जुलैपासून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपये येणार! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती किती आहेत?

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर 14.2 किलो ग्रॅम च्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एलपीजी सिलेंडरच्या पूर्वीचे दर जसे आहेत तसेच स्थिर आहेत. जून महिन्यात ज्या भावात एलपीजी सिलेंडर मिळत होते त्याच भावात जुलै महिन्यात देखील घरगुती सिलेंडर मिळणार आहे. पहा घरगुती सिलेंडरचे महानगरामधील दर. LPG Gas Cylinder Price

  • मुंबई – 802.50 रुपये
  • दिल्ली – 803 रुपये
  • कोलकत्ता – 803 रुपये
  • चेन्नई – 818.50 रुपये

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 3000 कोटी रुपये जमा? लाभार्थी यादी तपासा

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमती ठरतात

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चौदा किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ठरवत असतात. यापूर्वी एक ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.50 रुपयांनी घट झाली होती. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या घरात कुठलाही बदल झालेला नव्हता. या महिन्यात देखील त्याचप्रमाणे व्यवसाय सिलेंडरच्या दरात घट झाली आहे व घरगुती सिलेंडर दरात कुठलाही बदल झालेला नाही.

गेल्या एक वर्षात किमतीत मोठा बदल

एक जून 2023 रोजी पाहिले तर दिल्लीतील घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1103 रुपये होत्या. 30 ऑगस्ट 2023 रोजी 200 रुपयाची मोठी घट झाली आणि किंमत 903 रुपये झाली. 9 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला. दरम्यान आज पासून मुंबईत व्यवसाय सिलेंडरची किंमत 1598 रुपये झाले आहे. यापूर्वी हे 1629 रुपयाला उपलब्ध होते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण! 1 जुलैपासून लागू नवीन दर, पहा तुमच्या शहरात किती रुपयाला मिळणार?”

Leave a Comment