LokSabha Election | लोक सभेच्या निवडणुका झाल्या जाहीर; आचारसंहितेमधिल पहा 10 महत्वाचे नियम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LokSabha Election | नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की आजपासून महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम हा सुरू झालेला आहे. आणि अशातच आचारसंहिता ही पण लागू झालेले आहे.

तर या एकूण सात टप्प्यांमध्ये आता ही लोकसभा (LokSabha Election) निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यामध्ये आज या निवडणुकांची घोषणाही केलेली आहे.

आणि या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता ही लागू होणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद ही घेतलेली आहे. व त्यामध्ये त्यांना आपल्या भारत देशातील निवडणुकांची सविस्तर माहिती सांगितली आहे.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला किती खर्च करता येणार आहे? आचारसंहितेमध्ये कोणत्या गोष्टीचा पालन हे करावा लागेल? व या आचारसंहितेमधील आणखीन महत्त्वाचे कोणते 10 नियम आहेत याबद्दल जाणून घेऊया.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच आज ओरिसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांच्या लोकसभा निवडणूकांच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या या आजच्या घोषणेनंतर भारत देशातील आचारसंहिता ही लागू झालेली आहे.

देशभरातील स्वातंत्र्य व निष्पक्ष निवडणूक व्हावी, म्हणून यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचारसंहिता असे संबोधले जात आहे. लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक दरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार व नेतेमंडळी आणि इतर राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते.

या आचारसंहितेमधील पहा महत्वाचे 10 नियम कोणते आहेत ते? See what are the 10 most important rules in this code of conduct?

  • निवडणुकीमध्ये वैयक्तिक पातळीवरील टीका नको.
  • धार्मिक व व्देषपुर्ण ही विधाने केली जाऊ नये.
  • कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या मतदारांना धमकावलं जाणार नाही.
  • प्रचार सभा मिरवणूक व रॅली काढायचे असेल तर याआधी पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे.
  • नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच हे काम पूर्ण करावं लागेल.
  • उमेदवाराला धर्म जात पंथ या प्रकारच्या आधारे हे मतदान मागता येणार नाही.
  • कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होईल अशी मतदानाच्या वेळी कृती करता येणार नाही.
  • निवडणुकांमध्ये कसल्याही प्रकारची भांडणे किंवा हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • लोकसभेच्या प्रचाराला लहान मुलांचा वापर झाला तर क** कारवाई ही करण्यात येईल.
  • फेक न्युज अफवा किंवा इतर खोट्या बातम्या पसरवणे खपवून घेतले जाणार नाही.

महाराष्ट्र राज्यामध्ये पाच टप्प्यात हे मतदान होणार आहे, कुठे कधी होणार हे मतदान?

  • 19 एप्रिल- रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर.
  • 26 एप्रिल- बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
  • 7 मे- रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, महाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
  • 13 मे- नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
  • 20 मे- धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई.

Leave a Comment

error: Content is protected !!