LIC Scheme | आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज भासते. पुढील संकटासाठी गुंतवणूक करणे चांगले मानले जाते. पैसा कमवायला लागल्यानंतर सगळ्यात आधी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. जर एखादा संकट आले. तर गुंतवणूक केलेली उपयोगी पडते. घरातील एखाद्या व्यक्तीचा आजना मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची जबाबदारी झेलणे अवघड असते. अशावेळी एलआयसी पॉलिसी करण्याचा सल्ला तज्ञांच्या माध्यमातून दिला जातो.
एलआयसी मध्ये अशा अनेक योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून भविष्यातील गरज भागवता येते. एलआयसी पॉलिसीच्या योजना सुरक्षा आणि गुंतवणूक दोन्ही प्रदान करत असतात. एलआयसीच्या अनेक योजना देशभरात खूप लोकप्रिय आहेत.
हे पण वाचा: नागरिकांसाठी आनंदाची बातमी पाच लाख नाहीतर 7.50 लाख रुपये आरोग्य विमा कवच मिळणार
अशीच एक योजना म्हणजे जीवन जीवन प्रगती योजना. एलआयसीच्या विविध उत्पन्न गटांचा विचार करून अनेक उत्तम योजना चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला एलआयसीचे एक खास योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत, ती म्हणजे जीवन प्रगती योजना आहे.
या योजनेमध्ये तुम्ही फक्त दोनशे रुपये पर्यंत गुंतवणूक करून 28 लाख रुपये पर्यंत लाभ घेऊ शकता. ही एक नॉन लिक्ड आहे. या योजनेमध्ये तुम्हाला संरक्षण आणि बचत दोन्ही मिळते. या योजनेत गुंतवणूकदाराचे जोखीम कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. गुंतवणुकीचे गणित समजून घेऊया ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त दोनशे रुपयांची बचत करून 28 लाख रुपये पर्यंत परतावा मिळू शकतात.
एलआयसीच्या जीवन प्रगती योजने मध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्ही दररोज दोनशे रुपये वाचवल्यास. अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे एक महिन्याचे सुमारे सहा हजार रुपये असतील. त्याचवेळी तुम्हाला वार्षिक 72 हजार रुपये जमा होतील.
तुम्हाला एलआयसी चे जीवन प्रगती योजनेत वार्षिक आधारावर ७२ हजार रुपये गुंतवले लागणार आहेत. या योजनेमध्ये वीस वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला परी पक्वतेच्या वेळी 28 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय तुम्हाला रिस्क कव्हरचा हिला मिळणार आहे. एलआयसी जीवन प्रगती योजनेअंतर्गत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीमध्ये विम्याची रक्कम अंतिम बोनस एकत्रित आणि एकत्रीतपणे दिले जातात.