Lek Ladki Yojana: नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजनामध्ये खालीलप्रमाणे मिळेल लाभज्या कुटुंबांकडे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून जे अनुदान मिळणार आहे ते खालीलप्रमाणे असणार आहे.
कसे व किती मिळणार पैसे?
- जेंव्हा मुलीचा जन्म होईल त्यावेळी सुरुवातीला ५ हजार रुपये मिळतील.
- मुलगी जेंव्हा इय्यता १ ली मध्ये शिक्षणासाठी जाईल त्यावेळी ६ हजार रुपये मिळतील.
- इयत्ता ६ वीमध्ये ७ हजार रुपये मिळेल.
- मुलगी जेंव्हा इयत्ता ११ वीमध्ये जाईल त्यावेळी ८ हजार रुपये मिळतील.
- सर्वात शेवटी मुलीचे वय जेंव्हा १८ वर्षे पूर्ण होईल त्यावेळी ७५ हजार रुपये अनुदान मिळेल.
- अशाप्रकारे एकूण १ लाख १ हजार रुपये एवढी रक्कम लेक लाडकी योजना अंतर्गत लाभार्थीस दिली जाणार आहे.
कोणाला मिळेल लाभ?
1 एप्रिल 2023 नंतर जमलेल्या मुलींना या लेक माझी लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर दोन अपत्य झाली उदारणार्थ 1 मुलगा व 1 मुलगी असेल तर मुलीस या योजनेचा लाभ दिला जाईल.
पहिले जे अपत्य होईल त्या अपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असणार आहे. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पहिले अपत्य असेल आणि त्यानंतर जुळी मुली झाल्यास त्यांना सुद्धा मिळणार लाभ त्यानंतर मात्र माता पित्यास कुटुंब नियोजन करणे गरजेचे असणार आहे.
येथे क्लिक करून अर्ज डाउनलोड करा | Lek Ladki Yojana
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
- अपत्याचा जन्माचा दाखला.
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
- लाभार्थीचे आधार कार्ड.
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या रेशनकार्डची छायांकित प्रत.
- जेंव्हा मुलीला शेवटचा अनुदानाचा हफ्ता मिळेल त्यावेळी मुलीचे वय १८ वर्षे असेल त्यामुळे मुलीच्या मतदान कार्डची छायांकित प्रत.
- शाळेचा दाखला.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.
- अनुदानाचा शेवटचा हफ्ता मिळविण्यासाठी मुलगी विवाहित झालेली नसावी.
कोठे सादर करावा लागणार अर्ज?
सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज सादर करून द्या. पुढे अंगणवाडी सेविका हा अर्ज ऑनलाईन करून घेतील.
हे पण वाचा:- 50 हजार ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज, 0% व्याज दर, येथून ऑनलाइन अर्ज करा
1 thought on “या कुटुंबातील सर्व मुलींना मिळणार लेक लाडकी योजनेचा लाभ..! किती मिळणार, कसा मिळणार? पहा सविस्तर माहिती”