लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार, त्यासाठी हे काम करणे आवश्यक..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: नमस्कार, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी लाडकी बहीण योजना घोषित केली गेली आहे. या योजनेसाठी महिलांची 21 जुलैपासून अर्ज करण्याची मोठी गर्दी झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ही गर्दी पाहून सरकारने अटी कमी करून कालावधीत वाढ केली आहे. तसेच अर्ज करण्याचा कालावधी पंधरा दिवसा वरून दोन महिन्यापर्यंत वाढवण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसाठी पात्र महिलांना दोन महिन्यात कधी जरी अर्ज केला तरी पात्र महिलेला दोन महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे एक सोबत 3 हजार रुपये मिळणार आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्या महिलेने 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज केला तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रित त्यांना मिळतील.

एक जुलैपासून योजना सुरू होताच, योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांची गर्दी झाली आहे. आवश्यक कागदपत्रे जमा करताना महिलांना मोठा त्रास होत असल्याचे दिसत आहे. राज्यभर अनेक ठिकाणी भर पावसात रानातील सर्व कामे सोडून महिला तासून तास रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. Ladki Bahin Yojana

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यातील या मार्केटमध्ये कांद्याला मिळत आहे सर्वाधिक बाजार भाव, जाणून घ्या आजचा बाजार भाव

या सर्व प्रकाराणे या योजनेतील अटीवरून राज्य सरकारवर आरोप प्रत्यारोप झाले. या योजनेतील काही अटी काढून टाकण्याची मागणी देखील राज्यभर सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बैठक घेतली आणि या बैठकीत योजनेतील अटीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार या योजनेतील काही अटीत बदल करून त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदिवासी दाखल्याची अट रद्द

या योजनेसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरलेली उत्पन्न व आदिवासी दाखल्याची अट शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या व्यक्तीकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही. मात्र ज्यांचे रेशन कार्ड पांढरे किंवा गुलाबी आहे त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे.

सोन्याच्या भावात मोठी घसरण! सोन्याचे नवीन दर ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

या योजनेसाठी द्यावे लागणारे आदिवासी दाखल्याची (डोमासाईल सर्टिफिकेट) अट रद्द करण्यात आली आहे. अखेरीस संबंधित महिलेला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चार पुऱ्या पैकी एक पुरावा आदिवासींसाठी जोडावा लागणार आहे.

पर राज्यात जन्मलेल्या आणि राज्यातील पुरुषासोबत विवाह केलेल्या महिलेसाठी तिच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक दाखला सोबत जोडावा लागणार आहे. हे नसेल तर मात्र संबंधित महिलेला आदिवासी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात बदल! या सर्व राज्यांमध्ये मोठी घसरण, पहा नवीन दर

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्ड / मतदान कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला यापैकी एक
  • पांढरे किंवा गुलाबी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा पुरावा देणे आवश्यक आहे.

सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्य शासनाने एक ॲप लॉन्च केले आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वर जाऊन “नारी शक्ती” नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ओपन करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला फॉर्म भरून सदरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करून या योजनेसाठी अर्ज करू शकता. किंवा तुम्ही जवळील ग्राहक सेवा केंद्रात जाऊन देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार, त्यासाठी हे काम करणे आवश्यक..”

Leave a Comment