Kunbi Caste Certificate : गेल्या तीन-चार दिवसापासून जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा तसेच कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षही कार्यनिहीत करण्यात आले आहे. तीन दिवसात 57 हजार नोंदी आढळे आहेत यात जात पडताळणी समितीकडून दिलेले 52 हजार 677 कुणबी प्रमाणपत्र आहेत. तर चार हजार अकरा नोंदी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाला सापडले आहेत.
मराठवाड्यात कुणबी नोंदणी शोधण्याची मोहीम सुरू आहे. त्याचप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभाग आयुक्त आणि सर्वोच्च जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन शोध मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून निवास जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील कक्षाचे सदस्य सचिव आहेत.
या समितीमध्ये जिल्हा परिषदेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी व सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन तालुका स्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसात प्राथमिक शाळा मधील अकरा लाख 14 हजार शाळा सोडल्याचा रजिस्टर मधील नोंदी तपासले असून यात चार हजार अकरा जणांच्या कुणबी नोंदी आढळले आहेत.
दुसरीकडे जात पडताळणी समितीकडून 21 नोव्हेंबर 2016 पासून म्हणजे ही समिती जिल्ह्यात सुरू झाल्यापासून आजपर्यंत 52 हजार 677 कुणबी नोंदी विक्रीत केले आहेत. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत 56 हजार 677 जणांच्या कुणबी प्रमाणपत्र जा नोंदी माहिती प्राप्त झाली आहे.
मोठ्या प्रमाणात नोंदी सापडण्याची शक्यता
जाड पडताळणी समितीने आतापर्यंत 52 हजार 677 कुणबी दाखले दिले आहेत. इतर ठिकाणीही अजून बऱ्याच नदी सापडत आहेत महसूल पोलीस यंत्रणा खरेदी विक्री दस्तऐवज नगर शहरातील वस्तू संग्रहालय जन्म मृत्यूच्या नोंदीच्या शाळेतील दाखल्याचे रेकॉर्ड यांचा शोध संबंधित यंत्रणे कडून सुरू आहे यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता आहे.