KapusTur Bajar Bhav | तूरीला 9901 रुपये भाव तर कापसाला किती? पहा, आजचे बाजारभाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KapusTur Bajar Bhav | मागच्या तीन महिन्यापासून बाजार समितीमध्ये कापसाचे दर हमीभाव अपेक्षा कमी आहेत. यामुळे तपासून बघत शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावा लागत आहे. तसेच तुरीच्या भावामध्ये मागील काही दिवसापासून वाडी कायम असून बाजारभावामध्ये तुरीचे भाव तेरा आहे. तर काही बाजार भाव मध्ये तुरीच्या भावाने उसळी घेतली आहे. जालना बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक 9901 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला.

जालना बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीची 2324 क्विंटल एवढी आवक झाली आहे. तर इथे कमाल 9901 ते किमान 7100 तसेच सर्वसाधारण 9400 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. अमरावती बाजार समितीमध्ये लाल तुरीची आवक 462 क्विंटल एवढी झाली आहे. तर इथे कमाल 9494 ते 8000 तर सरासरी 8747 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

आजचे कापुस बाजार भाव (Today’s cotton market price)

तुरीला चांगला भाव मिळत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. मागील तीन महिन्यापासून कापसाचे दर सातत्याने घसरत आहेत. कापसाचे दर हमीभाव पेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा पेक्षा अधिकचा दर कापसाला मिळाला आहे.

बोरगाव मंजूर बाजार समितीमध्ये कापूस 114 क्विंटल आवक झाली असून कमाल 7250 ते किमान 6900 तर सरासरी 7025 रुपये प्रतिक्विंटल, हिंगणघाट बाजार समिती कापसाची 12000 क्विंटल आवक झाल्यापासून कमाल 7145 ते किमान 6000 तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

दरम्यान केंद्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी उच्च प्रतीच्या कापसासाठी 7020 रूपये तर सामान्य दर्जाच्या कापसासाठी 6800 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला.

Leave a Comment

error: Content is protected !!