Indian Meteorological Department : काही दिवसापासून राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. नुकताच हवामाना विभागाने नवीन एक अंदाज वर्तवला आहे. राज्यातील पावसाळी वातावरणात निवडले आहे. तसेच ढगाळ वातावरणाची शक्यताही दिसत नाही. तर काही ठिकाणी सकाळी हवेमध्ये गारवा जाणवत आहे. तसेच पुढील येत्या काळात हवेमध्ये गारवा वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाळी वातावरण निवळलेले दिसून येत आहे. त्यामुळे पहाटेची किमान तापमानाचा पारा दोन ते तीन अंश घसरून सरासरी सामान्य पातळी पोहोचली असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
दोन-तीन दिवसानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. संक्रातीदरम्यान चांगली थंडी वाढणार अशी अपेक्षा आहे. विदर्भात लगेच चांगली थंडी पडू लागलेली आहे असे. ज्येष्ठ हवामान निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
एका मागे एक पश्चिम झंजावत साखळी उत्तर भारतात सुरूच आहे. उद्या मध्यम पश्चिम झंजावत वायुकडून येऊन अपेक्षित थंडीला पूरक ठरू शकते. दक्षिणेतील हिवाळी पावसाचा हंगाम आटोपण्याची शक्यता असताना अजूनही केरळ तामिळनाडू राज्यात पावसाचा जोर कायम आहे.
त्यामुळेच महाराष्ट्रात आता जसे दोन दिवस वातावरण बदलले होते. तसे वातावरण बदल होत आहे. तीन आठवडे उलटे तरी पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, अजून दाट धुक्याची चादर दिसते. अजून काही दिवस हि काही दिवस ही स्थिती राहू शकते. याचा परिणाम खानदेशातील जिल्ह्यांमध्ये होत आहे. असेही खुळे यांनी यावेळी सांगितले.