Indian Meteorological Department : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व चिंता वाढवणारी बातमी आहे.
नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. नाशिक व अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. द्राक्ष कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. सतत झालेल्या व काही पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे पिके व नुकसानग्रस्त झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये अक्षरशा पाणी आले
यंदा राज्यांमध्ये म्हणावी तशी थंडी पडली नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता तीन पुढील दिवस जळगाव नाशिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच नंदुरबार, धुळे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व दक्षिण कोकणात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
सध्या मध्ये भारतावर दोन विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव होत आहे. हरियाणाचा पश्चिम प्रकोप प्रणाली आहे. हवेच्या वरती थरार ही प्रणाली चक्रीय वात स्थिती रूपात आहे.
याचबरोबर उत्तर प्रदेशात नैऋत्येला चक्रीय वाद स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या अंतभागापासून उत्तर प्रदेशातील या चक्रीय पर्यंतची ढगांची द्रोणी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडून येणारा चारा हा सोबत आद्रता घेऊन येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारी या कालावधीत तुरळ ठिकाणी हलके ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
ज्या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर चाललेला आहे किती शेतकऱ्यांनी अतिशय काळजी घ्यावी.