Thursday

13-03-2025 Vol 19

निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार नागरिकांना देणारं मोठ गिफ्ट, घरगुती सिलेंडरच्या किमती इतक्या रुपयांनी होणार कमी, निर्मला सीतारामन घेणार हा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Cylinder Price : 2024 हे निवडणुकीचे वर्ष असणार आहे लोकसभेनंतर राज्यामध्ये विधानसभेचे निवडणूक लागणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूऊ बीजेपी सरकार नागरिकांसाठी मोठे गिफ्ट देऊ शकते. येथे काही दिवसांमध्येच देशभरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

या निवडणुका पूर्वी सध्याचे सरकार नागरिकांसाठी मोठे निर्णय घेऊ शकते. निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. आगामी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत यामुळे महिलांच्या मतावर आता राजकीय पक्षांचा डोळा आहे.

वेगवेगळे सरकार महिलांसाठी खास असे योजना जाहीर करत आहे. दरम्यान लोकसभेचा सार्वत्रिक निवडणुका पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पुढील महिन्यात अगदी सुरुवातीलाच केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे.

महिलांसाठी येता केंद्रीय अर्थसंकल्पनात मोदी सरकार दुसऱ्या कार्यकाळच्या शेवटच्या बजेटमध्ये काही वेगवेगळ्या घोषणा जाहीर करू शकते. महिलांची वोट बँक आपल्याकडे वळावी यासाठी केंद्रातील सरकार प्रयत्न करत आहे.

सोशल मीडिया द्वारे मिळालेल्या माहितीनुसार महिला मतदारांना साधण्यासाठी केंद्र सरकार गॅस सिलेंडर साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. खरे तर सध्या स्थितीला पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर 300 रुपये पर्यंत अनुदान मिळत आहे.

विचार जर केला तर पीएम उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना फक्त गॅस 603 रुपये मध्ये मिळत आहे. या आधी त्यांना दोनशे रुपये एवढी सबसिडी दिली जात होती. मात्र, गेल्या वर्षी या सबसिडीमध्ये शंभर रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये पर्यंत सिलेंडर वर सबसिडी देण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना 903 रुपये पर्यंतचे गॅस सिलेंडर फक्त सहाशे रुपयांमध्ये मिळत आहे.

येत्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये आणखी वाढ करू शकते असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आलेले आहे.

सध्या या लाभार्थ्यांना तीनशे रुपये पर्यंत सबसिडी मिळत आहे. मात्र ही सबसिडी पाचशे रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे अशी महिलांची मागणी आहे. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार याबाबत काही सकारात्मक निर्णय घेते काही याकडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *