Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! निर्यात बंदीनंतर केंद्राकडून पुन्हा कांदा खरेदीची तयारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Export Big News : चालू हंगामामध्ये गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाल्याने कांद्याच्या उपलब्ध सह गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यातच सरकारने निर्यात बंदी केल्याने शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे.

केंद्र सरकारने आठ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च 2024 या कालावधीत कांदा निर्यात बंदी केली आहे परिणामी बाजारात कांदा घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोटीचे नुकसान होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप दादा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्री लाईन पुन्हा शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे साधनेची बतावणी सुरू केली आहे ते हाच धागा पकडून भाऊ स्थिर करण निधी योजना अंतर्गत खरीप कांदा खरेदी होणार आहे मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कोंडी होत असल्याचे ओरड येत आहे.

या परिस्थितीत ग्राहकांपेक्षा शेतकरी जास्त अडचणीत सापडला आहे मात्र सरकारला ग्राहकांच्या अधिक चिंता असल्याचे चित्र पाहायला मिळाले केंद्राने यापूर्वी 40 टक्के निर्यात मूल्य केले.

त्यानंतर किमान निर्यात मूल्य प्रति टन 800 डॉलर करून अप्रत्यक्ष निर्यात बंदी केली . त्यातच आता थेट निर्यात बंदीचा निर्णय लादला. मात्र आता शेतकऱ्यांचा संताप अनावर होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने भाव स्थिर करण निधी अंतर्गत पुन्हा एकदा खरीप कांद्याची खरेदी सुरू झाली आहे.

मागील वर्षी लेट खरीप हंगामात कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या खाली असताना केंद्र सरकारने या पद्धतीने पहिल्यांदा खरेदी केली. तर आता खरीप कांद्याची खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार एनसीसीएफ आणि नाफेड यांच्या प्रत्येक एक लाख असे दोन लाख टन खरेदी चे काम देण्यात आले आहे.

मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्विंटल २,४१० रुपये दर जाहीर होऊन तो शेतकऱ्यांना मिळाला नव्हता टीका होऊ नये याच पद्धतीने खरेदी होणार असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील खरेदीत अनेक वादातीत मुद्दे पुढे आले होते. केंद्राच्या खरेदीदार संस्थांनी शेतकरी कंपनी महासंघ यांना खूप खरेदीदार म्हणून तर महासंघाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांचे खरेदीदार म्हणून नेमले. त्यात अनागोंदी पुढे आली होती या कंपन्यांना व खरेदी नको अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

त्यावर आंदोलन झाले जिल्हा अधिकारी केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री यांनी यातील माहिती मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी समितीला सहकार्य केले नसल्याचे पुढे आले होते. असे असताना याच पद्धतीने खरेदी होत असल्याने यामागे काय दडले आहे. हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात कांदा खरेदी

एनसीसीएफ’ने कांदा खरेदी वर्ष २०२३-२४ साठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये १२ खरेदी केंद्रांची माहिती दिली आहे. भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्यात चांगल्या दर्जाच्या कांद्याची खरेदी होणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत खरेदी सुरू असल्याचे शाखा व्यवस्थापक परिक्षित. एम यांनी सांगितले

Rushikesh

One thought on “शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! निर्यात बंदीनंतर केंद्राकडून पुन्हा कांदा खरेदीची तयारी

  1. कशाला हा कांदा खरेदीचा देखावा याच्यापासून शेतकऱ्याला कुठलाही फायदा मिळत नाही उलट व्यापाऱ्याचा जास्त फायदा होतो कारण सर्व व्यापारी हा कांदा नाफेडला विकतात नाफेडचे कर्मचारी श्रीमंत होतात फक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *