IMD Weather update | अरबी समुद्रातून पुन्हा एक नवीन संकट डोकं वर काढत आहे, शक्ती चक्रीवादळ या नावाने ओळखले जाणारे हे वादळ सध्या समुद्राच्या मध्यभागी होत असून येत्या दोन दिवसात गुजरातच्या किनारपट्टीला स्पर्श करण्यात असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे या वादळी तीव्रता जरी वाढत असली तरी त्याचा फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर बसणार की नाही ? पहा तर त्यांनी काय म्हटले. IMD Weather update
सध्या हे वादळ गुजरात मधील द्वारका आणि पाकिस्तानच्या कराची पासून अंदाजे 300 ते 350 किलोमीटर अंतरावर आहे. दिवसातून सुमारे आठ किमी प्रति तास वेगाने पुढे सरकत असून पुढील टप्प्यात ते पूर्व उत्तर दिशेने जाऊन पुन्हा ओमान कडे वळू शकतो असा अंदाज वर्तनात आला आहे म्हणजेच वादळ भारताचे किनाऱ्यावरून जोरात धडकण्याची शक्यता कमी आहे.
पण तितक्यात काही मध्यमानी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि वादळाचा तडाका अशा प्रकारच्या बातम्या पसरायला सुरुवात झाली आहे. यावर हवामान विभागाने स्पष्ट शब्दात खुलासा केला आहे की, काळजी करू नका महाराष्ट्राला मोठा धोका नाही मात्र समुद्रात लाटा उसळत असल्यामुळे मच्छीमारांनी कोणतेही परिस्थितीत खोल समुद्रात जाऊ नये.
दुसरीकडे गुजरातच्या किनारपट्टीवर ७ ऑक्टोबरच्या सुमारास 40 ते 50 किमी तास वेगाने वारे वानर असून, पण तेही फार धोकादायक पातळीचं नसणार म्हणजेच वादळ रुद्र रूप धारण करेल अशी भीती सध्या तरी नाही. म्हणजेच हवामानाचा काही सांगता येत नाही म्हणून सतर्क राहणं खूप गरजेचं आहे.
ग्रामीण भागातील लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडेल का? यावर तज्ञांचे म्हणणं आहे की या वादळामुळे कोकण ते उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. मोठ्या पावसाचा अंदाज नाही पण हवेत ओलावा राहिल्याने दिवसा उकाडा आणि रात्री थंडव्हा असा अनुभव येणार आहे.
शक्ती चक्र वादळाचे स्वरूप नेमकं काय असेल हे पुढे काय तासांमध्ये पष्ट होणार आहे पण एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. हवामान बदलाचा परिणाम आता अधिकाधिक ठळकपणे जाणून लागलाय कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी आता पुन्हा चक्रीवादळ निसर्गाचा राग आणि कृपा दोन्ही अनुभवात आपण जगत आहोत.
सरकार आणि हवामान विभाग आपलं काम करत आहे, सूचना देत आहे पण खरी जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची असणार आहे. वाऱ्यांच्या वेगाची वाट पाहण्यापेक्षा आधीच तयारी करणं कधीही चांगलं.
हे पण वाचा | ‘रेमल’ चक्रीवादळ आज किनाऱ्यावर पोहोचले; चक्रीवादळ म्हणजे काय? ही वादळ कसे तयार होतात? पहा IMD चा हवामान अंदाज