IBPS RRB Vacancy 2025 | सरकारी नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! IBPS कडून 13,294 पदांची भरती, लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS RRB Vacancy 2025 | देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि दिवस रात्र मेहनत करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी मोठी असणार आहे. कारण आता आयबीपीएस ने मोठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये आयबीपीएस (Institute of Banking Personal Selection) मार्फत देशभरामध्ये रीजनल रुरल बँकांमध्ये तब्बल 13,294 पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. ही भरती क्लर्क पासून ते PO आणि ऑफिसर स्केल पदांसाठी होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे. म्हणजे आजचा दिवस तुमच्यासाठी अर्ज करण्यासाठी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा ही संधी गमवू नका. IBPS RRB Vacancy 2025

या भरतीसाठी सर्वाधिक म्हणजे 8022 पद क्लर्क (मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंट) यासाठी आहेत. तर ऑफिसर स्केल I साठी 3,928 पद, ऑफिसर स्केल II साठी 1142 पद, आयटी ऑफिसर, CA ऑफिसर, लॉ ऑफिसर, ट्रेझरी मॅनेजर, MBA फायनान्स व मार्केटिंग ऑफिसर, एग्रीकल्चर ऑफिसर अशी विविध पदे देखील या भरतीसाठी समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ऑफिसर्स स्केल III साठी 202 पद आहेत. या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळे ठेवण्यात आली असून पदवीधर उमेदवारांना सर्वाधिक संधी आहे. मात्र काही पदांसाठी अनुभव आणि विशिष्ट डिग्री आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा (Important dates)

अर्ज सुरू – 1 सप्टेंबर 2025, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2025, फी भरण्याची अंतिम तारीख- 28 सप्टेंबर 2025, प्रिलीम परीक्षा- नोव्हेंबर 2025, निकाल डिसेंबर 2025/जानेवारी 2026, मेन्स परीक्षा डिसेंबर २०२५ /फेब्रुवारी 2026

अर्ज फी (Application fee)

SC, ST, PWBD उमेदवारांसाठी – 175 रुपये तर इतर उमेदवारांसाठी 850 रुपये

वयोमर्यादा

  • क्लर्क (ऑफिस असिस्टंट) 18 ते 28 वर्ष
  • ऑफिसर स्केल I – 18 ते 30 वर्ष
  • ऑफिसर स्केल II – 21 ते 32 वर्ष
  • ऑफिसर स्केल III – 21 ते 40 वर्ष

निवड प्रक्रिया

  • क्लर्क – प्रिलिम्स + मेन्स परीक्षा
  • ऑफिसर स्केल I प्रिलिम्स +मेन्स + मुलाखत
  • ऑफिसर स्केल II व III लिखित परीक्षा + मुलाखत

ही भरती फक्त भरती नाही तर तरुणांसाठी संधी आहे बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी पुन्हा मिळणार नाही. स्थिर नोकरी, चांगला पगार आणि बँकिंग क्षेत्रातील करियर अशी तिहेरी संधी या भरतीमध्ये आहेत. आज अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात वर्षांवर्ष महिन्यात करतात अशा तरुणांसाठी ही भरती एक सोन्याची संधी आहे. आज 28 सप्टेंबर रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उशीर न करता लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा.

हे पण वाचा | IBPS PO Requirement 2023 | पदवीधरांनो तयारीला लागा IBPS अंतर्गत विविध बँकेमध्ये बंपर भरती आता अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!