HSC SSC Exam Update: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना टेन्शनमध्ये आणणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीचे पेपर टाईम टेबल आल्यानंतर परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत, व त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर बोर्ड परीक्षेला इमारत उपलब्ध करून देणार नाही अशी भूमिका मंडळांनी स्पष्ट केले आहे.
आपल्याला माहित आहे दहावी बारावीचे पेपर अगदी काही महिन्यांवर आली आहे. अशात विद्यार्थ्यांना टेन्शन देणारी बातमी आली आहे. महाराष्ट्राचे शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्याकरिता बोर्डाचे पेपरावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
प्रलंबित मागणी करिता मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र अजून या पत्रांचा काही प्रतिउत्तर आलेले नाही. कसलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही. या कारणाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा वर शिक्षण महामंडळाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
असे करण्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बारावीचे बोर्ड परीक्षा हे फेब्रुवारी महिन्यात सुरू होत आहे, अगदी बोर्डाचे पेपर तोंडावर असताना राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या पूर्ण होईपर्यंत परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण महामंडळाचे वतीने असे स्पष्ट करण्यात आले आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री व अर्थमंत्री आमच्या सर्व प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढत नाही तोपर्यंत शाळेचे इमारती व कर्मचारी बोर्डाच्या परीक्षा करिता उपलब्ध होणार नाही अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने घेतली आहे.
महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या :
महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून 2012 पासून भरती प्रक्रिया झालेले नाही ही भरती प्रक्रिया तातडीने करावी.
महाराष्ट्राच्या आतापर्यंत सर्व अनुदानित शाळेचे वेतनत्तर अनुदान थकीत द्यावे.
जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण येते तेव्हा आर्थिक तरतूद बाबत माहिती द्यावी.
या सर्व मान्य पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.